*कोंकण एक्सप्रेस*
*तळवणे येथे १२ ते १६ फेब्रुवारी भंडारा उत्सवाचे आयोजन*
*विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
तळवणे येथील श्रीमंत सद्गुरु परशुराम भारती महाराज संजीवन समाधी मठात दिनांक १२ ते १६ फेब्रुवारी २०२५ रोजी भंडारा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
नवनाथार्चन पूर्वक विष्णूयाग-दिनांक १२ फेब्रु.ते १६ फेब्रुवारी पर्यंत होणारे नियोजित कार्यक्रम पुढीप्रमाणे:- बुधवार दिनांक १५ फेब्रुवारी 2025 सकाळी आठ वाजता गणपती पूजन ,देवता वंदन पुण्याहवाचन, आचार्यवरण, स्थलप्राकार शुद्धी, समाधीपुरषlवर लघु रुद्र, दुपारी १२:०० वा. ग्रामदेवतांचे मंदिरात आगमन, दुपारी १:०० वा. नैवेद्य ,आरती, तीर्थप्रसाद, दु.२:०० वा.महाप्रसाद,सायंकाळी ७:०० वा.”भारतीगाथा” नामवंत कलाकार यांची संगीत,भक्तीगीत,गजल मैफिल. रात्रौ ९:०० वा.पालखी सोहळा, रात्रौ १०:०० पावणी (लिलाव) रात्रौ ११:०० वा. अरोलकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग.
दि.१३ फेब्रु. स.८ वा.धार्मिक विधी प्रारंभ, दु.१:०० वा. नैवेद्य ,आरती, तीर्थप्रसाद,दुपारी १:३० ते ४:०० महाप्रसाद, रात्रो १०:०० वा.श्री सतिदेवी मित्रमंडळ तळवणे वेळवेवाडी खिरईवाडी पुरस्कृत,विनोदी नाट्यपुष्प “सोरगत”
शुक्रवार दि.१४ फेब्रु.स.८ वा.धार्मिक विधी प्रारंभ, दु.१:०० वा. नैवेद्य ,आरती, तीर्थप्रसाद,दुपारी १:३० ते ४:०० महाप्रसाद,, सायं. ह. भ. प.भाऊ नाईक, वेतोरे यांचे किर्तन रात्रौ.१०:०० वा.खानोलकर दशावतार यांचा नाट्य प्रयोग.शनिवार दिनांक १५ फेब्रुवारी ,.स.८:०० वा.धार्मिक विधी प्रारंभ, दु.१:०० वा. नैवेद्य ,आरती, तीर्थप्रसाद,दुपारी १:३० ते ४:०० महाप्रसाद, सायं.७:०० वा.” राशी नुसार तुमचा स्वभाव”,ज्योतिषाचार्य डॉ.सौ.स्मिता गिरी, रात्रौ १०:०० वा.वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळ ,तेंडोली यांचा”आयोध्याधिश श्रीराम” नाट्यप्रयोग.
रविवार दिनांक १६ फेब्रुवारी , स.८:०० वा.धार्मिक विधीस प्रारंभ,गणेश याग, दु.१:०० वा.आरती,देवता प्रार्थना ,आशीर्वाद ग्रहण,तीर्थप्रसाद. दु.१:३० वा.श्री गावडेश्वर प्रासादिक भजन मंडळ फणसखोल ,बुवा सिद्धेश गावडे,” गजर हरिनामाचा” रात्रौ ९:३० वा.गुरुगृपा नाट्य मंडळ, तळवणे – मठवाडी यांचं धम्माल विनोदी नाट्य पुष्प,” पांडगो इलो रे इलो”सोमवार दिनांक १७ फेब्रुवारी , स.८:०० वा. महापुरुष व गणपती यांची नित्य पूजा ,अभिषेक, दु.१२:०० वा.आरती नैवेद्य , दु.४:०० वा.गणपती मूर्ती चे विसर्जन.
तरी या भंडारा उत्सवाला सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री महंत राजेंद्रस्वामी भारती, मठवाडी व तळवणे ग्रामस्थांनी केले आहे.