९ फेब्रुवारीला शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन

९ फेब्रुवारीला शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन

*कोंकण एक्सप्रेस*

*९ फेब्रुवारीला शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन*

*६४ केंद्रांवर होणार परिक्षा*

*सिंधुदुर्गनगरी : जिमाका*

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेली, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8 वी) रविवार दिनांक 09 फेब्रुवारी 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ( इ. 5 वीसाठी 37 केंद्र व इ. 8 वीसाठी 27 केंद्र मिळून) 64 परीक्षा केंद्रावर होणार आहे.सदर परीक्षेसाठी इ. 5 वी साठी 4 हजार 367 विद्यार्थी व इ 8 वी साठी 2 हजार 358 विद्यार्थी प्रविष्ठ झालेले आहेत.

परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांसोबत हॉल तिकीट अनिवार्य आहे. सदर परीक्षा दिनांक 09 फेब्रुवारी 2025 रोजी पेपर क्रमांक 1 सकाळी 11 ते 12.30 व पेपर क्रमांक 2 दुपारी 2 ते 3.30 या वेळेत दोन सत्रात होणार आहेत. याबाबतची नोंद सर्व पालक, विद्यार्थी यांनी घ्यावयाची असून, कोणतीही शंका असल्यास जवळच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालय तसेच केंद्रशाळामध्ये संपर्क करावा. तसेच विद्यार्थ्यांनी परीक्षेला संबंधित परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी किमान 30 मिनीटे उपस्थित रहावे असे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांनी केले आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी शिक्षण विभागाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!