*कोंकण एक्सप्रेस*
*अंकनाद पाढे सात्मिकरण स्पर्धेत गवाणेची जिनत जावेद शेख राज्यात प्रथम*
*कासार्डे : संजय भोसले*
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा गवाणे या शाळेतील इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थीनी कु. जिनत जावेद शेख हिने मॅप एपिक कम्युनिकेशन प्रायवेट लिमिटेड आणि राज्य मराठी विकास संस्था,महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय स्पर्धा – लोकमान्य टिळक अंकनाद पाढे सात्मिकरण राष्ट्रीय स्पर्धा ,पर्व 6 मध्ये बालगट आणि पहिली या गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
तिच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी देवगड – श्रीरंग काळे, शिक्षण विस्तार अधिकारी – लहू दहिफळे , केंद्रप्रमुख – जावेद शेख , शाळा व्यवस्थापन समिती गवाणे, शिक्षकवृंद, पालक ,ग्रामस्थ वर्गातून कौतुक करण्यात येत आहे.
या यशात मार्गदर्शक शिक्षक म्हणून मुख्याध्यापक तथा वर्गशिक्षक अमरीन जावेद शेख ,लक्ष्मण घोटकर( उच्च श्रेणी मुख्याध्यापक – सोमलेवाडी ) उपशिक्षक दिपाली गवई ,सद्गुरू तळेकर, आदिंचे मार्गदर्शन लाभले.