*कोंकण एक्सप्रेस*
*फोंडाघाट येथे फार्मर आयडी साठी शेतकरी मेळावा संपन्न*
*कणकवली : प्रतिनिधी*
आज दिनांक ०६/०२/२०२५रोजी फोंडाघाट महसूल मंडळ तलाठी ऑफिस मार्फत ग्रामपंचायत कार्यालय फोंडाघाट येथे फोंडाघाट शेतकरी बंधू भगिनींन साठी ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत आपला ७/१२उतारा आधार कार्ड शी लिंक करून फार्मर आयडी मिळवण्यासाठी शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता.
सदर मेळाव्याचे दिपप्रज्वलन तसेच शेतकरी बांधवांना फार्मर आयडी चे वाटप मा.सरपंच सौ.संजना संजय आग्रे, तसेच नायब तहसीलदार श्री कोकरे साहेब यांचे हस्ते करण्यात आले.या प्रसंगी महसूल अधिकारी श्री. दिलीप पाटील साहेब, मंडळ अधिकारी श्री. मोंडे साहेब, तलाठी श्री एस.बी. सावंत, ग्रामविकास अधिकारी श्री. जाधव, फोंडाघाट वि. सेवा सोसायटी चेअरमन राजन नानचे जेष्ठ शेतकरी श्री प्रकाश सावंत तसेच फोंडाघाट मधील शेतकरी बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच फोंडाघाट मधील काॅमन सर्विस सेंटर चालक उपस्थित होते.यावेळी बोलताना सरपंच सौ. आग्रे मॅडम, नायब तहसीलदार श्री. कोकरे साहेब, श्री.दिलीप पाटील साहेब यांनी फोंडाघाट मधील शेतकरी बंधू भगिनींनी या शासनाच्या उपक्रमाचा जास्तीत लाभ घेऊन शासनाच्या पीएम किसान सन्मान, मुख्यमंत्री नमो किसान सन्मान योजना तसेच शासनाच्या विविध कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा आणि फोंडाघाट मधील सर्व C S C सेंटर चालकांनी उत्तम प्रकारे शेतकरी बांधवांना सेवा देऊन शासनाच्या उपक्रमाची जनतेमध्ये वाहवा मिळवावी जेणेकरून आपल्या CSC सेंटरमध्ये आणखीन शासनाच्या विविध योजना आपल्या सेंटर मार्फत जनतेला सेवा देण्यासाठी शासन प्रोत्साहन देईल.असे आवाहन मान्यवर मंडळींनी केले.श्री. राजन नानचे यांनी उपस्थित मान्यवर मंडळींचे तसेच बहुसंख्येने उपस्थित शेतकरी बंधू भगिनींनचे आभार व्यक्त करून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.

