खारेपाटण मध्ये आढळले आले दुर्मिळ युरेशियन ग्रिफॉन गिधाड

खारेपाटण मध्ये आढळले आले दुर्मिळ युरेशियन ग्रिफॉन गिधाड

*कोंकण एक्सप्रेस*

*खारेपाटण मध्ये आढळले आले दुर्मिळ युरेशियन ग्रिफॉन गिधाड*

*छायाचित्रकार रमेश जामसांडेकर यांनी आपल्या कॅमेऱ्यात युरेशियन ग्रिफॉन चे टिपले छायाचित्र*

*खारेपाटण : प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्हयाच्या प्रवेशद्वारी खारेपाटण गावात दुर्मिळ युरेशियन ग्रिफॉन प्रजातीची स्थलांतरी गिधाडे विहार करत असल्याचे निदर्शनास आले आहे.खारेपाटण मच्छी मार्केट परिसरात रविवारी २ फ्रेब्रुवारी दुपारीच्या दरम्यान ही गिधाडे आढळून आली.

कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावामध्ये शुक नदीच्या काठावर मच्छी मार्केट परिसरात कुक्कुट पालनातील कचरा आणि मासळीचे उरलेले अवयव उघड्यावर टाकले जातात.त्यावेळी घारी बगळे कावळे घिरट्या घालतात.उंचावरून या आलेला गिधाड्याच्या मागे कावळे लागले.ती दोन गिधाडे इमारतीच्या छतावर उतरल्याचे स्थानिकांनी सांगितले . छायाचित्रकार रमेश जामसांडेकर यांनी घटना स्थळी दाखल होऊन त्यातील एका गिधाडाचे यांनी छायाचित्र टिपले त्यानंतर हे गिधाड सुख नदीच्या पलिकडील डोंगराच्या दिशेने उडत गेले . सोशल मीडियावर या गिधाडाचे फोटोग्राफ टाकून पक्षी वन्य जीव गिधाड की घार यांची विचारणा करण्यात आली . मुंबईतील पर्यावरण वन्यजीव म्हणून कार्यरत असलेले प्रतिनिधी अभ्यासक अक्षय मांडवकर यांनी फोटोग्राफ मागून घेतले अखेर युरेशियन ग्रिफॉन गिधाड असल्याचे सांगितले . कोकणामध्ये गिधाडांची मोठी संख्या रायगड जिल्हयात दिसून येते.

कोकणातील म्हासाळा आणि श्रीवर्धन तालुक्यात गिधाडांचा कायम स्वरूपी अधिवास आहे. प्रामुख्याने या ठिकाणी पांढऱ्या पाठीच्या आणि लांब चोचीच्या गिधाडांच्या कायम स्वरूपी अधिवास आहे शिवाय स्थलांतर करून येणाऱ्या हिमालयीन ग्रिफॉन ,युरेशियन ग्रिफॉन’ , आणि काळया गिधाडांची नोंद आहे. तज्ञानी दिलेल्या माहिती नुसार खारेपाटण मध्ये दिसलेले गिधाड हे युरेशियन ग्रिफॉन प्रजातीचे निमवस्यक आहे. युरेशियन ग्रिफॉन गिधाडे प्रामुख्याने मध्ये भारतापर्यंतच्या मध्य प्रदेशांमध्ये ववकचितच दिसतात . खारेपाटण मध्ये आढळलेले गिधाड ही स्थलांतरा दरम्यानच या ठिकाणी आली असावीत . पश्चिम घाट कोकण परिसरात रायगड आणि सिंधुदुर्गातील तिलारी प्रदेशात युरेशियन गिधाड स्थलांतर करून येत असल्याच्या तुरळक नोंदी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!