जिल्हा परिषद शाळेच्या मुलांचे आरोग्य तपासणी शिबिर

जिल्हा परिषद शाळेच्या मुलांचे आरोग्य तपासणी शिबिर

*कोंकण एक्सप्रेस*

*जिल्हा परिषद शाळेच्या मुलांचे आरोग्य तपासणी शिबिर*

*कणकवलीत उपजिल्हा रुग्णालयाचा अनोखा उपक्रम*

*कणकवली : प्रतिनिधी*

कणकवली शहरातील भालचंद्र बाबा शाळा क्रमांक 3 या  जि प शाळेतील शालेय मुलांचे आरोग्य तपासणी शिबिर 6 फेब्रुवारी रोजी घेण्यात आले.या शिबिरामध्ये 250 मुलांची आरोग्य तपासणीसह ब्लड ग्रुप, ईतर रक्ताच्या तपासणी करण्यासाठी घेऊन जवळपास 100 मुलांचे आभा आयडी काढण्यात आले,याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले योजना कीटकजन्य आजार ,जलजन्य आजार लसीकरण कार्यक्रम क्षयरोग इत्यादी राष्ट्रीय कार्यक्रमाविषयी जनजागृती करण्यात आली.

यावेळी वैद्यकीय अधीक्षक विशाल रेड्डी ,गटशिक्षणाधिकारी किशोर गवस,प्रशांत बुचडे,वैशाख गोसावी, डॉ. वाघमारे,डॉ. संजय चाटे,चेतन कोरे,भारती भोसले, शीतल पालव,नीता दाभोळकर,रश्मी नाईक, याच बरोबर शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष राणे मॅडम व ईतर पालक आणि उपजिल्हा रुग्णालयाचा स्टाफ ,शाळा क्रमांक 3 चे शिक्षक ई उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!