आईचे नाव ओळखपत्रावर – विद्यार्थ्यांच्या नावा सोबत आईचेही जोडले नाव

आईचे नाव ओळखपत्रावर – विद्यार्थ्यांच्या नावा सोबत आईचेही जोडले नाव

*कोंकण एक्सप्रेस*

*आईचे नाव ओळखपत्रावर – विद्यार्थ्यांच्या नावा सोबत आईचेही जोडले नाव*

*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवाणे चा स्तूत्य उपक्रम*

*कासार्डे : संजय भोसले*

शासन निर्णयानुसार सर्व शालेय कागदपत्रांवर आईचे नाव सक्तीचे करण्यात आले आहे.महाराष्ट्र शासनाने सर्व कागदपत्रांवर आईचं नाव बंधनकारक केले आहे. शासकीय कागदपत्रांमध्ये आता वडिलांच्या नावाप्रमाणेच आईचे नाव लावणे देखील बंधनकारक करण्यात आले आहे. फक्त हेच नाही तर वडिलांच्या नावाच्या अगोदर आईचे नाव लावणेही आवश्यक असणार आहे. …आणि याची अंमलबजावणी शालेय ओळखपत्रापासून करण्यात आली आहे.

शाळेच्या या उपक्रमाची पालक ,ग्रामस्थ,आणि अधिकारी वर्गातून प्रशंसा करण्यात येत आहे.या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशालेच्या मुख्याध्यापक अमरीन जावेद शेख, लक्ष्मण भागा घोटकर(उच्च श्रेणी मुख्याध्यापक)पदवीधर शिक्षक सद्गुरू ज्ञानेश्वर तळेकर,उपशिक्षिका दिपाली अरुण गवई यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!