*कोंकण एक्सप्रेस*
*तिरोडा येथील गावडे कुलदेवता कोल्हारवाडी वार्षिक जत्रौत्सव 19 फेब्रुवारीला*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
तिरोडा येथील श्री देवी मूळ भूमिका वस पंचायतन कुळकार गावडे कुलदेवता परिवार कोल्हारवाडी वार्षिक जत्रौत्सव माघ कृष्ण षष्टी शके 1946 बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे.यानिमित्त सकाळी महाअभिषेक, समराधना, केळी ठेवणे व मानवणे, ओटी भरणे, नवस बोलणे व फेडणे यासह रात्रौ 10.00 वाजता दीप उजळणे,रात्रौ 10.30 वाजता फटाक्याची आतषबाजी,रात्रौ 11.00 वाजता सवाद्य पालखी मिरवणूक,रात्रौ 12.00 वाजता आजगावकर दशावतार नाट्य मंडळ, आजगांव ( सावंतवाडी ) यांचा दणदणीत नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला आहे.
तरी सर्व भाविकांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

