*कोकण Express*
_*सीबीएसई १०वी, १२वीच्या परीक्षा वेळापत्रकात बदल*_
◾ सीबीएसईने शुक्रवारी (५ मार्च २०२१) रोजी दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे.
◾ नवं वेळापत्रक हे सीबीएसई बोर्डाच्या cbse.nic.in या अधिकृत वेबसाईटवर पहायला मिळेल.
◾ *१२वीच्या परीक्षा वेळापत्रकात हे बदल*
सीबीएसईने जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार, १२वीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. यापूर्वी ही परीक्षा १३ मे रोजी होणार होती मात्र, आता या विषयाची परीक्षा ८ जून २०२१ रोजी होणार आहे. यासोबतच इतिहास आणि बँकिंग परीक्षांच्या तारखेतही बदल करण्यात आला आहे.
◾ *१०वीच्या परीक्षा वेळापत्रकात हे बदल*
तर इयत्ता १०वीच्या विज्ञान आणि गणित या विषयांच्या परीक्षांच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. १०वीच्या विज्ञान विषयाची परीक्षा आता २१ मे रोजी होणार आहे आणि गणित विषयाची परीक्षा २ जून रोजी होणार आहे.
◾ *दोन शिफ्टमध्ये परीक्षा*
सीबीएसईने जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार, १२वीची परीक्षा चार दिवसांसाठी दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे. पहिल्या शिफ्टमध्ये सकाळी १०.३० वाजता परीक्षा सुरू होईल आणि दुपारी १.३० वाजेपर्यंत सुरू राहील. तर दुसऱ्या शिफ्टमध्ये दुपारी २.३० वाजता परीक्षा सुरू होईल आणि सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सुरू राहील.