*कोंकण एक्सप्रेस*
*देशभक्त शंकरराव गव्हाणकर महाविद्यालयात उडान महोत्सव साजरा*
*आम.दीपक भाई केसरकर विज्ञान महाविद्यालयची प्रणाली कोटेकर तृतीय*
*दोडामार्ग : शुभम गवस*
दिनांक ०५ फेब्रुवारी २०२५ रोजी देशभक्त शंकरराव गव्हाणकर महाविद्यालय उडान महोत्सव साजरे करण्यात आले.आजीवन अध्ययन व विस्तार विभाग मार्फत आयोजित दरवर्षी या स्पर्धांचे आयोजन केले जाते.
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत विकासासाठी हा महोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात प्रत्येक कॉलेजच्या विद्यार्थ्यांना घेऊन साजरा करण्यात येतो. पथनाट्य , पोस्टर कॉम्पिटिशन, सुजन वकृत्व स्पर्धा, इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या.या स्पर्धेत मुलांचा भरघोस प्रतिसाद होता. मुलांनी आपल्या कलागुणांनी प्रेक्षक वर्गात आपली छाप उमटवली.
यात आमदार दीपक भाई केसरकर विज्ञान महाविद्यालय ची विद्यार्थिनी कुमारी प्रणाली कोटेकर सर्जनशील लेखन या स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकाविला. तसेच महाविद्यालयाच्या मुलांनी पथनाट्य यात ही भाग घेतलेला होता. तसेच महाविद्यालयातील मुलांचे सहभागी व विजेत्यांचे सत्कार करण्यात आले.

