*कोंकण एक्सप्रेस*
*सिंधुदुर्ग इलेक्ट्रॉनिक डीलर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा यशस्वीपणे संपन्न*
*कुडाळ : प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग इलेक्ट्रॉनिक डीलर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी, सायंकाळी 7 वाजता कोकण हेरिटेज रिसॉर्ट, कुडाळ येथे मोठ्या उत्साहात पार पडली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. जिल्ह्यातील सर्व नामांकित इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स या सभेला हजर होते.
2019 साली स्थापन झालेल्या या संघटनेने जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक्स डीलर्सना एकत्र आणून ग्राहकांना उत्तम ब्रँड्स आणि सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महत्वपूर्ण प्रयत्न केले आहेत. या सभेत डीलर्सच्या गुणवंत मुलांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.
संघटनेचे अध्यक्ष श्री. सुनील नाडकर्णी यांनी डीलर्सना मार्गदर्शनपर भाषण देत आपले इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील अनुभव कथन केले. दीपक भोगटे यांनी संघटनेचे महत्त्व आणि कार्यपद्धती यावर मौल्यवान मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राणे इलेक्ट्रॉनिक्सचे अलंकार रावराणे यांनी आपल्या खास शैलीतून केले.
प्रत्येक डीलरने असोसिएशनच्या कार्यपद्धती आणि त्याचे झालेले फायदे यावर आपले मनोगत मांडले. संघटनेमुळे वाढलेल्या मैत्री संबंधांबद्दलही डीलर्सनी आपले विचार व्यक्त केले.
संघटनेचे सचिव आर के इलेक्ट्रॉनिक्स यांनी मागील वर्षाचा ताळेबंद सादर करून संघटनेच्या सामाजिक योगदानाबद्दल माहिती दिली. या बैठकीत जिल्ह्यातील चाळीस डीलर्स उपस्थित होते, ज्यात अलका ट्रेडर्स, राणे इलेक्ट्रॉनिक्स, शामदीप ट्रेडर्स, विद्या इलेक्ट्रॉनिक्स, साई ट्रेडर्स, निलीेशा इलेक्ट्रॉनिक्स, श्री एंटरप्राइजेस, जेपी रेफ्रिजरेशन, महालक्ष्मी सेल्स, बिजली इलेक्ट्रॉनिक्स, प्रशांत इलेक्ट्रॉनिक्स, देवेश एंटरप्राइजेस, वेलकम इलेक्ट्रॉनिक्स, गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्स, इंदिरा ट्रेडर्स, महालक्ष्मी इंटरप्राईजेस, पुजारी रेफ्रिजरेशन, वसुंधरा रेफ्रिजरेशन, आर के इलेक्ट्रॉनिक्स, श्री कृपा इलेक्ट्रॉनिक्स, इंदिरा ट्रेडर्स, महालक्ष्मी ट्रेडर्स, पटेल इलेक्ट्रॉनिक्स, ओमकार एजन्सी, गॅलेक्सी इलेक्ट्रॉनिक्स आणि अनेक मान्यवर डीलर्स यांचा समावेश होता.
काही महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेतले गेले. सभेची सांगता निलीशा इलेक्ट्रॉनिक्स, कणकवली यांनी सर्व वक्त्यांचे आभार मानून केली.

