*कोंकण एक्सप्रेस*
*कुडाळ येथे ९ फेब्रुवारीला बाल आनंद मेळावा*
*कुडाळ : प्रतिनिधी*
सहयोगिनी महिला मंडळ (कुडाळ) च्यावतीने ९ फेब्रुवारीला सायंकाळी ४ वाजता कुडाळ-गवळदेव येथे बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
यात फॅन्सी ड्रेस स्पर्धा होणार आहे.ही स्पर्धा तीन ते सात आणि आठ ते बारा या वयोगटात होणार आहे.स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मुलांची नाव नोंदणी मेघा सुकी व नीता गोवेकर, मोबा-९४२११९१०१७यांच्याकडे करावी. तसेच सुदृढ बालक स्पर्धा ही सहा महिने ते तीन वर्षे गटासाठी आहे. त्यासाठी नावनोंदणी राजश्री सावंत व सुचित्रा भोगटे यांच्याकडे करावी. सात फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करणाऱ्या मुलांना स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन सहयोगिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा रुपाली शिरसाट यांनी केले आहे.

