*कोंकण एक्सप्रेस*
*बॅ.खर्डेकर महाविद्यालयात १४ रोजी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा*
*वेंगुर्ला : प्रतिनिधी*
बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ले यांच्यावतीने शिवजयंतीनिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे.
या स्पर्धेतील शालेय गटासाठी ‘सुभाषचंद्र बोसः भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील जाज्वल नायक’ हा विषय आहे. तर खुल्या गटासाठी ‘शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ऐतिहासिक महत्त्व’ असा विषय आहे. शालेय गटातील प्रथम क्रमांक विजेत्या तीन व दोन उत्तेजनार्थ क्रमांकास अनुक्रमे रू. १,०००, रू. ७५०, रू. ५००, रू. ३००. रू. ३०० आणि चषक तसेच खुल्या गटातील प्रथम क्रमांक विजेत्या तीन व दोन उत्तेजनार्थ क्रमांकास अनुक्रमे रू. १,५००, रू. ११००, रू. ७५०, रू. ५००. रू. ५०० आणि चषक देण्यात येणार आहेत. संपर्क प्रा. डॉ. सचिन परुळकर-९४२१२३८०५३.