शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी करण्याचे आवाहन

शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी करण्याचे आवाहन

*कोंकण एक्सप्रेस*

*शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी करण्याचे आवाहन*

*सावंतवाडी : प्रतिनिधी*

शिधापत्रिकाधारकांना जीवनाश्यक वस्तू सवलतीच्या दरात मिळवून देण्यासाठी सरकार विविध योजना राबविते.योजनांचा योग्य लाभगरजूंना मिळावा, यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत धान्य लाभसुरू असलेल्या शिधापत्रिकाधारकांनी सोबत संलग्न केलेला आधार क्रमांक बरोबर असल्याची व शिधापत्रिकेतील व्यक्ती त्याच असल्याची खात्री करण्यासाठी केवायसी प्रक्रिया लवकर पूर्ण करून घेण्याचे आवाहन सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केले आहे.

याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे.त्यांनी म्हटले आहे की,शिधापत्रिका,आधारकार्ड कागदपत्रांसह रेशन दुकानदाराकडे जाऊन लाभार्थ्यांचा अंगठा पॉस मशीनवर ठेवावा लागेल. मशीनवर अंगठा यशस्वीरित्या स्कॅन झाल्यावर तुमची ओळख सत्यापित होईल आणि ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यावरच तुम्हाला शिधापत्रिकेवरील लाभ मिळू शकतील, याची नोंद घेणे आवश्यक आहे. जे लाभार्थी कामाकरिता बाहेरगावी राहत आहेत, त्यांनी त्यांच्या नजीकच्या रास्तभाव धान्य दुकानामध्ये भेट देऊन ई-केवायसी (E-KYC) प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, जेणेकरून कुणाचीही ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण राहणार नाही, असे त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!