*कोंकण एक्सप्रेस*
*गुढीपूर-पिंगुळी येथील श्री देव वरंडेश्वर मंदिराचा वर्धापनदिन १० फेब्रुवारीला*
*कुडाळ : प्रतिनिधी*
गुढीपूर-पिंगुळी (सांगिर्डेवाडी, शेटकरवाडी) येथील श्री देव वरंडेश्वर मंदिराचा चौथा वर्धापनदिन सोहळा सोमवार १० फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने विविध कार्यकमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यनिमित्त १० फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते ९.०० वाजता अभिषेक व श्रींचे पुजन, १० ते १२.०० वाजता श्री सत्यनारायण महापुजा, श्रींची आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १ ते ३.०० वाजता महाप्रसाद, ३ ते ५.०० वाजता महिलांसाठी हळदीकुंकू सायंकाळी ५ ते ६.०० वाजता हरिपाठ व सायंकाळी ७ वाजता नितीन आसयेकर प्रस्तुत श्री देवी भूमिका दशावतार लोककला नाट्यमंडळ यांचा श्री संत सद्गुरु देवावतारी बाळूमामा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी उपस्थित राहुन सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन देव वरंडेश्वर उत्सव समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

