*कोंकण एक्सप्रेस*
*जिल्हास्तरीय कथालेखन स्पर्धेत प्रा.नागेश कदम यांना प्रथम क्रमांक*
*आनंदयात्री वाङ्मय मंडळ,वेंगुर्ले यांचे आयोजन*
*मालवण : प्रतिनिधी*
आनंदयात्री वाङ्मय मंडळ,वेंगुर्ले आजोजित जिल्हास्तरीय कथालेखन स्पर्धेत मालवण सुनितादेवी टोपीवाला डी.एड कॉलेजचे प्रा.नागेश रघुनाथ कदम यांच्या ‘कविता’ या कथेला प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
आनंदयात्री वाङ्मय मंडळ वेंगुर्ले यांनी त्रैमासिक चौथ्या साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. यानिमित्त जिल्हास्तरीय कथालेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मालवण डीएड कॉलेजचे प्रा. नागेश कदम यांच्या ‘कविता’ कथेला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. साहित्य संमेलन कार्यक्रमात, कार्यक्रमाचे स्वगताध्यक्ष डॉ. पी. के. पाटील (प्राचार्य गोखले कॉलेज-कोल्हापूर), डॉ. माधुरी शानभाग ज्येष्ठ साहित्यिका- बेळगाव), डॉ. आनंद बांदेकर अँड. विलास कुवळेकर (रत्नागिरी), मंडळाच्या अध्यक्षा, सौ. वृंदा कांबळी जेष्ठसाहित्यिका), डॉ. ए. मी. चौगुले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रा. नागेश कदम यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.प्रा.नागेश यांच्या या यशाबद्दल प्राचार्य श्री. हेमंत प्रभू, संस्थेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, सचिव गणेश कुशे, सर्व शिक्षक वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.

