*कोकण Express*
*शिवसेना शाखा जानवली व मॉर्निंग क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जानवली आदर्शनगर येथे मुख्यमंत्री चषक क्रिकेट स्पर्धा*
*क्रिकेट स्पर्धचे उद्घाटन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते होणार*
*कणकवली ः प्रतिनिधी*
शिवसेना शाखा जानवली व मॉर्निंग क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मुख्यमंत्री चषक अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आज शुक्रवार ५ मार्च २०२१ रोजी संध्याकाळी ५ वाजता खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते जानवली आदर्शनगर येथील मैदानावर होणार आहे.
या क्रिकेटस्पर्धा शुभारंभाला प्रमुख पाहुणे म्हणुन शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांच्यासोबत शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, शिवसेना युवानेते संदेश पारकर, शिवसेना युवानेते अतुल रावराणे, शिवसेना जि.प.गटनेते नागेंद्र परब आणि अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी आपण सर्वांनी या क्रिकेट स्पर्धेला कोरोनाचे आवश्यक ते सर्व नियम पाळुन आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना शाखा जानवली व मॉर्निंग क्रिकेट क्लब जानवली यांच्यावतीने करण्यात आले आहे.

