*कोंकण एक्सप्रेस*
*कुडाळ येथे १०८ सूर्यनमस्कार शिबीर संपन्न*
*कासार्डे : संजय भोसले*
पतंजलि योग समिती सिंधुदुर्ग मार्फत कुडाळ येथे आज १०८ सूर्यनमस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले.आंतरराष्ट्रीय सुर्यनमस्कार दिनाचे अर्थात रथसप्तमी चे औचित्य साधून सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिराला अध्यक्ष म्हणून पतंजलि योग समिती सिंधुदुर्ग जिल्हाप्रभारी श्री शेखर बांदेकर आणि उदघाटक म्हणून संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ चे प्राचार्य डॉ स्मिता सुरवसे हे लाभले.
त्यावेळी कुडाळ हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज,कुडाळचे मुख्याध्यापक श्री.वराडे सर ,सोशल मीडिया तहसिल प्रभारी सावंतवाडी श्री लक्ष्मण पावसकर,श्री रामनाथ सावंत,श्री नारायण सावंत आणि श्री योगेश येरम आदी मान्यवर उपस्थित होते.

दिप प्रज्वलनाने उद्घाटन झाल्यानंतर १०८ सूर्यनमस्कार चे शिबीर जिल्हाप्रभारी श्री शेखरजी बांदेकर यांनी घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा प्रशांत केरवडेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री.अनिल मेस्त्री यांनी केले .सदर शिबिरास संत राऊळ महाराज महाविद्यालय च्या NCC युनिट चे विद्यार्थी, कुडाळ ज्युनिअर कॉलेज चे विद्यार्थी, पतंजलि योगवर्ग बांदा,सावंतवाडी आणि कुडाळ चे योगसाधक उपस्थित होते, तसेच कुडाळ शहरातील नागरिकांनी देखील सहभाग घेतला. असे एकूण २०० जणांचा सहभाग या शिबिरास लाभला. कुडाळ हायस्कूल च्या व्यवस्थापकांनी सदर शिबिरासाठी लागणारे स्टेज, साउंड सिस्टीम आणि जागा मोफत उपलब्ध करून दिली. येत्या काही दिवसात कुडाळ मध्ये अशा प्रकारचे योगाभ्यासाचे वर्ग आणि शिबीर होतील त्यात आपले स्कूल सहभागी होईल असे उदघाटक डॉ सुरवसे यांनी सांगितले.

