*कोंकण एक्सप्रेस*
*माणगाव दत्त मंदिरात ११ फेब्रूवारीपासून स्वाहाकार*
सावंतवाडी : प्रतिनिधी*
प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्येस्वामी महाराज स्थापित माणगाव तीर्थक्षेत्र येथील दत्त मंदिर येथे ११ फेब्रुवारीपासून स्वाहाकार कार्यक्रम होणार आहे. गुरू प्रतिपदा उत्सवात ‘श्री चंण्डीदत्तयाग’ आयोजित केला आहे. नांदोडकर स्वामी महाराजांनी १९७२ पासून दत्तयागाची सुरुवात केली. ११ ते १४ फेब्रुवारी रोजी दत्त मंदिर न्यासतर्फे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.
११ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.०० वा.अखंड नामस्मरणाला सुरुवात, रोज दुपारी १२.३० वा. आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद, सायं. ६.३० वा. आरती व ‘श्रीं’चा पालखी सोहळा होईल. रोज रात्री ८.३० वा. विश्वास कुलकर्णी (कर्वेनगर-पुणे) यांचे कीर्तन, १२ रोजी सकाळी ग्रामदेवता यक्षिणी, टेंब्येस्वामींचे जन्मस्थान तसेच प. पू. नांदोडकर समाधीस्थानी धार्मिक विधी, दुपारी १ वा. सिद्धी सुर्लकर पिळगावकर (गोवा) यांचे गायन, २.३० वा. राजाराम गवाणकर व सहकारी (कुडाळ) यांचे ‘गीत रामायण’, सायं. ४ वा. मंदार केळकर व सहकारी (गोवा) यांचा ‘स्वरानंद’ कार्यक्रम, १३ रोजी सकाळी सप्तशती पाठ, दत्तमाला मंत्र, दुपारी १ वा. टेंब्येस्वामींच्या जीवनावर आधारित भजन सेवा (बुवा-दीपक नानचे, शंकर (आनंद) कानडे, माणगाव), २.३० वा कृष्णा च्यारी, मुंबई (पं. अजित कडकडे यांचे शिष्य) यांचे गायन, सायं. ४ वा. ‘नाद’ म्युझिक अॅकॅडमी (कुडाळ) चे आदित्य आचरेकर, गोपाळ पवार यांचा ‘नादसंध्या’, १४ रोजी सकाळी ८ वा. अभिषेक पूजा, चंण्डीदत्तयाग, १०.३० वा. धार्मिक कार्यक्रम, दुपारी १ वा. शांती राजन शहा (मुंबई) यांचा ‘तेजोमय नादब्रह्म’ कार्यक्रम, २ वा. वैष्णवी धोंडीराज जोशी (रत्नागिरी) यांचा ‘स्वरगंधार’, ३.३० वा. योगेश सुहास रामदास (शैलेस्तीन शिरोडकर यांचा मराठी हिंदी भक्तिगीते व भावगीतांचा कार्यक्रम होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन विश्वस्त मंडळ, दत्त मंदिरने केले आहे.

