*कोंकण एक्सप्रेस*
*रत्नागिरीत छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला आमदार निलेश राणे यांनी लावली उपस्थिती*
*रत्नागिरी : प्रतिनिधी*
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर, कसबा येथे शिवप्रतिष्ठानच्या मार्फत हिंदू तिथीनुसार छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला कुडाळ मालवण विधानसभेचे कार्यतत्पर आमदार सन्माननीय निलेश नारायणराव राणे साहेब शिवभक्तांसमवेत उपस्थित होते.
यावेळी संगमेश्वरचा संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. ढोल ताशांच्या गजरात मंत्रोच्चारांचा जयघोष करत मिरवणूक काढत पालखीचे कसबा येथे आगमन झाले. छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीला विनम्रपणे अभिवादन करून या सोहळ्याला सुरुवात झाली आणि सर्वांच्या उपस्थितीत महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करत आरती करण्यात आली.

