एसटीची विनाअपघात सेवा बजावणाऱ्या सुनील तारी यांचा सत्कार

 कोंकण  एक्सप्रेस 

एसटीची विनाअपघात सेवा बजावणाऱ्या सुनील तारी यांचा सत्कार करताना मनोहर पालयेकर, भालचंद्र मराठे. बाजूला अजय गायकवाड, दादा कुडतरकर व इतर.

कणकवली : प्रतिनिधि 

एसटी स्थानकात स्वच्छता सेवा देणाऱ्या नंदू जाधव यांचा सत्कार करताना श्रद्धा कदम. बाजूला मनोहर पालयेकर, भालचंद्र मराठे, अजय गायकवाड, दादा कुडतरकर, जे. जे. शेळके व इतर.

एसटी व प्रवाशांचे नाते अधिक घट्ट होण्यासाठी प्रयत्न !

कणकवली बसस्थानकात प्रवासी संघटनेच्यावतीने प्रवासी दिन साजरा

एसटी व कोकणी माणूस यांचं अतूट नातं आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रिद घेऊन सुरक्षित प्रवासाची हमी एसटी देत आहे. काही अपवाद सोडल्यास कोकणातील गाव, वाड्या सोडल्यास एसटीची सेवा अखंडपणे सुरु आहे. येथील जागरूक प्रवासी व अशा प्रवासी संघटना यामुळे एसटी प्रशासनाला सुधारण्यास संधी मिळून प्रवासी सेवा अधिक कार्यक्षम करण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. यापुढेही एसटी व प्रवासी यांचे नाते अधिक घट्ट होण्यासाठी समन्वयातून प्रत्येक समस्या व अडचणींवर मार्ग काढू असे प्रतिपादन कणकवली आगार व्यवस्थापक अजय गायकवाड यांनी केले.
रथ सप्तमी व जागतीक प्रवासी दिनाचे औचित्य साधून कणकवली प्रवासी संघटनेच्यावतीने कणकवली बसस्थानकात प्रवासी दिन साजरा करण्यात आला. यावेळी श्री. गायकवाड बोलत होते. याप्रसंगी अध्यक्ष मनोहर पालयेकर, स्थानकप्रमुख प्रदीप परब, अशोक करंबेळकर, दादा कुडतरकर, वाहतूक नियंत्रक कृष्णा मुळदेकर, विनय राणे, संजय मालंडकर, विलास चव्हाण, राजाराम परब, मालचंद्र मराठे, सुगंधा देवरूखकर श्रद्धा कदम, प्रकाश वाळके, राजन भोसले, संदेश मयेकर, जनार्दन शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.
यानिमित्ताने एसटीत विनाअपघात सेवा करणाऱ्या चालक सुनील तारी, एसटीमध्ये सेवा करतानाच आपली अभिनयाची आवड जपणारे नाट्यकर्मी मारूती मेस्त्री, बसस्थानकाची स्वच्छता राखणारे नंदू जाधव, रोशन कदम यांचा सत्कार करण्यात आला.
मनोहर पालयेकर यांनी माषणात संस्थेने गेल्या काही वर्षात संघटनेच्या माध्यमातून केलेले उपक्रम, रेल्वे, एसटी, रिक्षा आदीसह प्रवाशांच्या समस्यांना कसा न्याय देण्याचा प्रयत्न केला, याबाबत विवेचन केले. तर दादा कुडतरकर, मालचंद्र मराठे, श्रद्धा कदम, रिमा भोसले, अशोक करंबेळकर, राजस रेगे आदींनी प्रवाशी संघटनेने गेल्या अनेक वर्षात राबविलेल्या उपक्रमांचे तसेच विविध प्रवाशांसंबंधी समस्यांबाबत केलेला पाठपुरावा याचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुमाष राणे, संदीप नानचे, अमित मयेकर, योगेश मुंज, अनिल परब, सी. आर. चव्हाण, रविंद्र कडुलकर, दिनेश गोगटे यांनी प्रयत्न केले. यावेळी माई चव्हाण, मनोहर मालंडकर, सूर्यकांत मेस्त्री, सुनील तारी, केशव जाधव, केशव पावसकर आदींसह प्रवासी, नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविक उपाध्यक्ष रमेश जोगळे यांनी केले. आमार सचिव विलास चव्हाण यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!