कोंकण एक्सप्रेस
मानसिश्वर जत्रेच्या निमित्ताने व्यावसायिकांकडून स्थानिक भाविकांची लूट थांबवावी मनसे ची मागणी.
वेंगुर्ला : प्रतिनिधि
मानसिश्वर जत्रेच्या निमित्ताने परराज्यातील आणि परजिल्ह्यातील व्यावसायिकांकडून स्थानिक भाविकांची लूट थांबवावी मनसे ची मुख्यधिकाऱ्यांकडे मागणी
काल वेंगुर्ला येथे मानसिश्वर परिसरातील व्यापारी आणि मनसे च्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी वेंगुर्ला यांची भेट घेऊन निवेदन सादर केले ह्यात असे नमूद केले आहे की
परजिल्ह्यातील काही हॉटेल व्यावसायिक पालिकेची कोणतीही परवानगी नसताना जत्रेपूर्वी पासून तेथे हॉटेल व्यवसाय लावतात सदर हॉटेल्स मध्ये दाम दुपटीने पैसे आकारतात तसेच शिळे अन्न ग्राहकांना देतात त्यामुळे ते ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करताहेत. ह्या हॉटेल व्यावसायिकाचा स्थानिक व्यापारी वर्गाच्या व्यवसायावर परिणाम होताना दिसतोय, त्यामुळे अश्या व्यापाऱ्यांवर कडक कार्यवाही व्हावी ही विनंती केली. ह्यावर तात्काळ कारवाही करण्यात येईल अशी ग्वाही मुख्याधिकारी ह्यांच्याकडून मिळाली! ह्यावेळी मनसे तालुका अध्यक्ष सनी बागकर शहर अध्यक्ष सुरज मालवणकर विभाग अध्यक्ष पवन बागायतकर उपतालुका अध्यक्ष महादेव तांडेल सोबत स्थानिक व्यावसायिक सर्व खालील प्रमाणे कृष्णाजी मांजरेकर, गौरेश नार्वेकर, दीपक आचरेकर, लुईस फेर्नांडिस, प्रशांत कोंडुस्कर, साईनाथ तुळस्कर, दीपक शिरगावकर, गजानन नरसुले, प्रकाश वेंगुर्लेकर आणि हेमांगी झारपकर हे उपस्थित होते.