हळबे महाविद्यालयात अर्थशात्र विभागा मार्फत, स्वयंसेवी क्षेत्र काल, आज, आणि उद्या, या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा संपन्न..

हळबे महाविद्यालयात अर्थशात्र विभागा मार्फत, स्वयंसेवी क्षेत्र काल, आज, आणि उद्या, या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा संपन्न..

कोंकण एक्सप्रेस

हळबे महाविद्यालयात अर्थशात्र विभागा मार्फत, स्वयंसेवी क्षेत्र काल, आज, आणि उद्या, या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा संपन्न..

दोडामार्ग तारीख 4 शुभम गवस .

लक्ष्मिबाई सीताराम हळबे महाविद्यालयात अर्थशात्र विभाग यांच्या विद्यमाने महाविद्यालयात स्वयंसेवी क्षेत्र काल, आज, आणि उद्या, या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा संपन्न झाली, या विषयावर बोलत असताना प्रमुख वक्ते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत होते, त्यांनी असे सांगितले की इंग्रजाच्या काळापासून स्वयंसेवी क्षेत्र जन्मास आले, जो पर्यंत लोक जागृत होत नाहीत तो पर्यंत विकास होणार नाही, म्हणून लोकांनी जागृत राहिले पाहिजे तसेच जो पर्यंत आपण इंग्रजांना विरोध करत नाही तो पर्यंत आपला विकास होणार नाही, अशी पूर्वी धारणा होती.

स्वयंसेवी क्षेत्राच्या माध्यमातून समाजाचे हित साधण्याचे काम मार्गी लागले. आणि याच माध्यमातून विकासाला गती मिळण्याचे मार्ग मोकळे झाले, कारण समाजहित साध्य करण्यासाठी समाज सेवी संस्थाची भूमिका महत्वाची आहे. त्याच बरोबर सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक , क्षेत्राला मदत करण्यासाठी स्वयंसेवी क्षेत्र पूर्वी पासून कार्यरत आहे, समाजामध्ये समभाव निर्माण करण्यासाठी आज गरज निर्माण झाली आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे आय. क़्यु. ए. सी. समन्वयक प्रा. डी. वाय. बर्वे, आणि अर्थशात्र विभाग प्रमुख डॉ. एस. यु. दरेकर, सतेच डॉ. एस. एन. खडपकर, उपस्थित होते, या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एस. यु. दरेकर, सूत्रसंचालन कु. सानिया गवंडकर तर आभार डॉ. एस. एन. खडपकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!