कोंकण एक्सप्रेस
तालुकास्तरीय खोखो व मैदान स्पर्धेत कासार्डे ज्युनिअर कॉलेजचे सुयश
नेहरू युवा केंद्र व युवा प्रतिष्ठान कणकवलीच्यावतीने कासार्डे येथे आयोजित स्पर्धा
कासार्डे प्रतिनिधी ; संजय भोसले
नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि युवा संकल्प प्रतिष्ठान कणकवली आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा कासार्डे ज्युनियर कॉलेज कासार्डे येथे संपन्न झाली. त्यात एकुण 30 खेळाडू सहभागी होते. खो खो खेळात मुलींचा संघाने उपविजेतेपद क्रमांक पटकावले आहे. तसेच वैयक्तिक स्पर्धेत 100 मीटर धावणे मध्ये कु.नेहा संतोष कदम -प्रथम,सानिया विलास पाळेकर- द्वितीय आणि कु.प्राजक्ता मेस्त्री -तृतीय तर गोळाफेक मध्ये नेहा कदम- द्वितीय तर क्षितिजा काळे हिने -तृतीय क्रमांक प्राप्त करून सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल.सर्व यशस्वी खेळाडूंना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यशस्वी विद्यार्थ्यांना ज्युनियर कॉलेजचे प्रा. श्री दिवाकर पवार,विनायक पाताडे आणि क्रीडा शिक्षक मारकड यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.सर्व यशस्वी खेळाडू तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे कासार्डे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष मनोज शेलार, सरचिटणीस रोहिदास नकाशे, स्थानिक व्यवस्था समिती कार्याध्यक्ष संजय पाताडे व स्कूल कमिटी पदाधिकारी तसेच संस्थेचे इतर सर्व पदाधिकारी तसेच कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पालक-शिक्षक संघ आणि विद्यालयाच्या मुख्याध्यापिका बी. बी. बिसुरे, पर्यवेक्षक एस. व्ही. राणे आदींसह सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.