*कोंकण एक्सप्रेस*
*विद्यामंदिर माध्यामिक प्रशालेला आमदार निरंजन डावखरे साहेब यांच्या विकास निधितून संगणक देणगी *
*कणकवली ः प्रतिनिधी*
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेला पदवीधर मतदार संघाचे आमदार मा निरंजन डावखरे साहेब यांच्या विकास निधितून प्रशालेला संगणक देणगी देवून उपकृत केले कणकवली शहरातील प्रगतीशील प्रशाला सर्वसामान्य नागरिकांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण देणारी प्रशाला म्हणून नावारुपाला आलेली आहे आधुनिक शिक्षणाचा प्रवाह विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी डिजिटल शिक्षण निर्माण करण्यसाठी संगणक शिक्षण प्रणाली अवगत व्हावी यासाठी विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेला सिंधुदुर्गचे पालक मंत्री मा. नितेजशी राणेसाहेब यांच्याहस्ते संगणक हस्ते प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सर व पर्यवेक्षक श्री अच्युतराव वणवे सर यांनी संगणक संच स्वीकारला . यावेळी भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते
प्रशालेच्या विकासात आमदार निरंजन डावखरे साहेब यांनी संगणक देणगी देऊन उपकृत केल्या बद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री . तवटे साहेब चेअरमन डॉ. साळुंखे मॅडम सचिव मा. श्री . विजयकुमार वळंजू साहेब विश्वस्त श्री अनिलपंत डेगवेकर साहेब व शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांनी आभार मानले.