कोंकण एक्सप्रेस
जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री मा. ना. नितेशजी राणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
सिंधुदुर्ग नगरी : प्रतिनिधी
आज सिंधुदुर्ग येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री मा. ना. नितेशजी राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, या बैठकीला कुडाळ मालवणचे आमदार मा. निलेशजी राणे साहेब उपस्थित होते
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भेडसावणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आणि जिल्ह्यातील सुनियोजित उपक्रम प्रगतीपथावर नेण्यासाठी कोणत्या उपाय योजना करता येतील यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्याशी निगडीत अनेक विषयांचा आढावा या बैठकीमध्ये घेतला.
या बैठकीला खासदार श्री. नारायणराव राणे साहेब, माजी मंत्री, आमदार श्री. दीपक केसरकर, आमदार श्री. निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी श्री. अनिल पाटील, जिल्हा परिषदेचे सीईओ श्री. मकरंद देशमुख, पोलिस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. यशवंत बुधावले तसेच संबंधित विभागांचे अधिकारी आणि अन्य सहकारी उपस्थित होते.