आ. निलेश राणेंच्या कर्तव्यपूर्ततेची पुन्हा चुणूक  : महामार्गांवरील बंद पथदिवे २४ तासात सुरु

आ. निलेश राणेंच्या कर्तव्यपूर्ततेची पुन्हा चुणूक : महामार्गांवरील बंद पथदिवे २४ तासात सुरु

कोंकण एक्सप्रेस

आ. निलेश राणेंच्या कर्तव्यपूर्ततेची पुन्हा चुणूक ; महामार्गांवरील बंद पथदिवे २४ तासात सुरु

कायमस्वरूपी समस्या मार्गी लावण्यासाठी स्वखर्चाने दिला ट्रान्सफॉर्मर; ग्रामस्थांतून कौतुक

कुडाळ : प्रतिनिधी

 

कुडाळ मालवणचे शिवसेना आमदार निलेश राणे यांच्या कर्तव्यपूर्ततेची चुणूक पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील पणदूर येथे बंद असलेले पथदिवे सुरू करण्याबाबत ग्रामस्थांनी त्यांचे लक्ष वेधले असता हे पथ दिवे त्यांनी तात्काळ २४ तासात सुरु केले. एवढ्यावरच न थांबता ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी निलेश राणे यांनी स्वखर्चाने ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिला आहे.

आमदार निलेश राणे यांची ही कृती निश्चितच लोकप्रतिनिधी कसा असावा याचा आदर्श मांडणारी ठरली आहे. २४ तासाच्या आत ट्रान्सफॉर्मर बदलून जनतेला अंधारातून बाहेर काढणारी महाराष्ट्रातील एकमेव घटना असेल अशी प्रतिक्रिया शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांनी व्यक्त केली आहे.

मुंबई – गोवा महामार्गावर पणदूर येथे ट्रान्सफॉर्मर जळल्यामुळे फ्लायओव्हर वरील पथदिवे गेले १५ दिवस बंद स्थितीत होते. त्यामुळे फ्लायओव्हर वरून वाहने हाकताना वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत होता. ग्रामस्थांनी ही बाब आमदार निलेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिली आमदार निलेश राणे यांनी सायंकाळपर्यंत पथदिवे चालू होईल असे आश्वासन दिले. तसेच शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांना याबाबत सूचना केल्या. यानंतर आनंद शिरवलकर, निखिल कांदळगावकर प्रकाश पावसकर यांनी स्वतः जातीनिशी लक्ष घालून विद्युत जनरेटर आणून पथदिवे सुरू करून घेतले, दिलेल्या शब्दाप्रमाणे एक दिवस जनरेटर वर पथदिवे सुरु झालेत खरे पण पुढील दिवसांचं काय? या प्रश्नाचे उत्तरही आमदार निलेश राणे यांनीच शोधले. अगदी स्व खर्चाने ट्रान्सफॉर्मर बसवून देत स्थानिकांनी मांडलेली समस्या सोडविण्यासाठी आमदार निलेश राणे पुढे सरसावले. सद्यस्थितीत ट्रान्सफॉर्मर बसविला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!