सिंधुदुर्ग जिल्हा विकसित आणि प्रगत जिल्हा बनविण्यासाठी सामूहिक जबाबदारी घेवून काम करूया

सिंधुदुर्ग जिल्हा विकसित आणि प्रगत जिल्हा बनविण्यासाठी सामूहिक जबाबदारी घेवून काम करूया

कोंकण एक्सप्रेस

सिंधुदुर्ग जिल्हा विकसित आणि प्रगत जिल्हा बनविण्यासाठी सामूहिक जबाबदारी घेवून काम करूया

* माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री,खासदार नारायण राणे यांचे जिल्हा नियोजन सभेत आवाहन

*अधिकारी साहेब नाही तर जनतेचे सेवक आहेत याची जाणीव ठेवून काम केल्यास मोठे काम उभे राहील

*कामचुकार आणि उध्ट अधिकाऱ्यांचे उपटले कान

* तर चागल्या कामाचे केले कौतुक

*आदर्श अधिकारी ,कर्मचारी असे पुरस्कार देण्याच्या दिल्या सूचना

*सूचनांची तातडीने अंमल बजावणी करून काम करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आदेश
 
ओरोस : प्रतिनिधी

नागरिकाच्या जीवनात परिवर्तन व्हावे यासाठी आपण आहोत. आम्ही साहेब नाही. आम्ही जनतेचे सेवक आहोत. याचे भान अधिकारी आणि कर्मचारी यांनी ठेवावे. चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घ्यावी.कामात कमी पडू नका. काम न होणे ही बदनामी जिल्ह्याची आणि प्रशासनाची आहे. काम करणाऱ्यांना शाबासकी द्या.असे सांगतानाच चांगले काम करणाऱ्यांना आदर्श अधिकारी ,कर्मचारी असे पुरस्कार द्या.असे मार्गदर्शन माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी केले. सामूहिक काम महत्वाचे आहे.एक माणूस कोणतेच काम करू शकत नाही.पालकमंत्र्यांना सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे आणि चांगले सामूहिक काम करूया असे आवाहन यावेळी त्यांनी केले .
जिल्हा नियोजन बैठकीत खासदार नारायण राणे यांनी सर्वच अधिकाऱ्यांची शाळा घेतली. चुकीची आणि मोगम उत्तर देणाऱ्या अधिकाऱ्यांना चागलेच सुनावले. तर चगल्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले,
जिल्हा नियोजनाची पहिली बैठक पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.भविष्यात हा जिल्हा विकसित व्हावा आणि चांगली विकासकामे व्हावीत अशी अपेक्षा आहे. त्यासाठी पालकमंत्री जोमाने काम करतील. कुठेही असलो तरी या ठिकाणच्या जनतेचे जीवन जवळून पाहतो.त्यामुळे आमच्या लोकांना चागले जीवन देण्याची, रस्त्ये,पाणी वीज,शिक्षण या बरोबरच जनतेच्या हितासाठी सुरू केलेल्या योजना जनतेपर्यंत पोचवा.
अधिकारी काम करण्यासाठी आहेत
तुम्ही अधिकारी काम करण्यासाठी आहात. होणार ..करणार ..अशी उत्तरे नकोत.जिल्हयाचे अर्थकारण शेती आणि पिशुसंवर्धन च्या माध्यमातून वाढविण्यावर भर द्या. यावर काम करा. अनेक योजना शासनाच्या आहेत. त्या लोकांपर्यंत पोचवा. आम्ही आकडे वारी ऐकण्यासाठी आलेलो नाही. काम करून दाखविले पाहिजे. अनेक अधिकारी पाहिले आहेत. मात्र काम तुम्ही अधिकारी करत नसतील तर त्यांना घरी बसवा राज्यात काम करणाऱ्या बेरोजगारांना तरी संधी मिळेल.
योजना सामान्य जनतेसाठी आहेत. असे खासदार नारायण राणे यांनी सांगितले.
आमदार निलेश राणे यांनी ठाकर समाजाच्या प्रश्नावर लक्ष वेधले. दाखल्यानसाठी पावरा नावाचा अधिकारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाचे दाखले अडवतात त्यांच्या संदर्भात मंत्री उईके यांच्या दालनात बैठक लावण्यात आलेली आहे. त्या अधिकाऱ्यांना त्या जागेतून काय करायचे याचा निर्णय घेतो असे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
विकास निधी प्रारूप आरखड्या प्रमाणे शासनाकडून आणणार मात्र त्या अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे विकास निधी खर्च करावा..
काँक्रिट चे रस्ते करा त्याची कॉलिती राहील.जे काम करत नाहीत आणि निकृष्ट काम केले त्यांना घरी बसवा. अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी केली.एमएसीबी ची दयनीय अवस्था आहे. जुन्या तारा आणि खांब बदलले पाहिजेत.अशी मागणी केली. दरम्यान पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांनी सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करावे.आणि काम करावे असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!