कोंकण एक्सप्रेस
नव्या संकल्पनेतील विद्यार्थी घडवूया – श्री. अजयराज वराडकर
मालवण : प्रतिनिधी
शिक्षण हे मानवी विकासाचे केंद्र असून उद्याच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आजच्या शिक्षणातून शिस्त ,संयम ,संस्कार शील याबरोबरच कौशल्य व तंत्रयुक्त ज्ञानाची गरज असून कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ त्यासाठी कटिबद्ध आहे. यासाठीच कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टाने संकेतस्थळाची निर्मिती करून भविष्यातील विद्यार्थ्यांसाठी येणारे आव्हाने व शिक्षण यांचा मेळ घालून आदर्श शाळा व आदर्श विद्यार्थी घडवण्याच्या कार्यातील सातत्य राखण्याचे व त्याला मूर्त रूप देण्याचे कार्य संकेतस्थळाच्या माध्यमातून केले आहे असे असे उद्गार कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टाच्या संकेतस्थळाच्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी श्री वराडकर यांनी काढले.
कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वल नाने तसेच योगात्मा डॉ.काकासाहेब वराडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून झाली.
या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे सचिव सुनीलजी नाईक यांनी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाने शिक्षणातील गुणवत्ता व त्यामधील सातत्य ठेवले असून सामाजिक बांधिलकी, शैक्षणिक क्षेत्रातील उपयोजनात्मकता व त्यासाठी सामाजिक, ज्ञानात्मक संदर्भ वाढविण्यासाठी चित्ररथाच्या माध्यमातून प्रयत्न केलेले असून कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष स्वर्गीय प्राचार्य श्री शरद वराडकर यांच्या संकल्पनेतील असलेला विषय चित्ररथाच्या माध्यमातून उर्जित अवस्था देऊन साकार केला आहे. चित्ररथाच्या माध्यमातून संस्थेच्या तिन्ही विभागाने आपले चित्ररथाचे प्रदर्शन केले असून आपला समन्वय योग्य पद्धतीने झाला तर निश्चितच कोणत्याही प्रगतीला वेग येणार आहे असे बोलताना संस्थेला येत्या काळात शंभर वर्षे पूर्ण होत असून आपली जबाबदारी वाढली आहे. अशा जबाबदारीतून आपल्याला कार्य करायचे असून भविष्यातील जबाबदारी निश्चितच पार पाडू असे आश्वासन देताना संकेतस्थळाच्या वापरा विषयी व त्याच्या जबाबदारीचे भान,भविष्यातील रोजगाराभिमुख शिक्षण याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच प्रशालेचे स्वर्गिय मुख्याध्यापक श्री.संजय नाईक यांच्या उल्लेखनीय कार्याचे स्मरण करण्यात आले.
कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (संयुक्त),वराडकर इंग्लिश स्कूल,डॉ.दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय कट्टा या
तिन्ही विभागातील आयोजित केल्या जाणाऱ्या उपक्रमाबद्दल, कार्यक्रमाबद्दल, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबी गुणवत्ते संदर्भात प्राप्त होणाऱ्या माहिती संकेतस्थळाच्या माध्यमातून पाहता येणार आहे याचबरोबर ही माहिती कायमस्वरूपी व शाश्वत राहील असे उद्गार डॉ.दादासाहेब कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी यांनी प्रास्ताविकतेतून आपले उद्गार काढले.
मुंबई विद्यापीठाची संलग्नित व महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या अंतर्गत येणाऱ्या कट्टा करिअर मार्गदर्शन अंतर्गत समन्वयक प्राध्यापक श्रुती कुंभार यांनी सादर केलेल्या उत्कृष्ट सादरीकरणाच्या माध्यमातून डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य चे प्राचार्य यांना उत्कृष्ट प्राचार्य म्हणून घोषित केले. त्याचबरोबर प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाल्याबद्दल कार्यक्रमात श्री ध्वजेंद्र मिराशी यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर कट्टा पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे सहसचिव श्री साबाजी गावडे यांचे सुपुत्र व प्रशालेचे माजी विद्यार्थी श्री.मंदार गावडे हे सिक्युरिटी सॉफ्टवेअर सोल्यूशन्स कंपनीच्या टेक टीम लीडर या पदावर कार्यरत असून प्रशालेच्या संकेतस्थळाच्या संदर्भात केलेल्या कार्याबद्दल संस्थेच्या वतीने शाल ,श्रीफळं व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. संकेतस्थळाच्या माध्यमातून मिळणारी माहिती व संकेत स्थळावरती उपलब्ध होणाऱ्या विद्यार्थी विकासांतर्गत होणाऱ्या उपक्रमाबद्दल तशी माहिती संदर्भात पालकांच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातूनउ अभिमानाचे व समाधानी भावनांचे दर्शन पहाण्यात आले येणाऱ्या काळात विद्यार्थी विकासासाठी संकेतस्थळाची उप लब्धी ही महत्त्वाची ठरणारी आहे या कार्यक्रमानिमित्त श्री.मंदार गावडे यांनी आपल्या मनोगतातून भविष्यातील कोणत्याही कार्यात आपले योगदान असेल असे अभिवचन दिले.
व्यासपीठावर कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री.अजयराज वराडकर सचिव सुनीलजी नाईक सचिव श्रीमती विजयश्री देसाई स्कूल कमिटी चेअरमन श्री सुधीर वराडकर संचालिका स्वाती वराडकर संचालक महेश वाईरकर वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ .देवयानी गावडे पर्यवेक्षक श्री.महेश भाट,इंग्लिश मीडियम स्कूल चे मुख्याध्यापक ऋषी नाईक, प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी, उपप्राचार्य श्री रविंद्र गावडे माजी वरिष्ठ लिपिक श्री.सुरेश कदम ज्येष्ठ शिक्षक श्री रविकुमार गावडे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा .श्रुती कुंभार प्रा. कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ .संपदा फोपले यांनी केले.