कोंकण एक्सप्रेस
ग्रामीण भागातील संगणकिय गुणवत्ता प्रसंशीनीय-डॉ.डॉन्टस
मालवण : प्रतिनिधी
विकासाचे क्षेत्र व्यापक झाले असून आता आपणाला तंत्रज्ञान आत्मसात करण्याशिवाय पर्याय नाही.कट्टासारख्या ग्रामीण भागात हे कार्य स्मिता कॉम्प्युटर च्या माध्यमातून गेली पस्तीस वर्ष सातत्याने सुरु असून या संस्थेचा लाभ दशक्रोशीतील विद्यार्थ्यांनी उठवावा व नवनवीन कौशल्ये आत्मसात करावीत असे मत व्यक्त करताना संगणक ज्ञानातील गुणवत्ता ही प्रशंसनीय असल्याबद्दल चे उद्गार पाचवी ते पदवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या मराठी माध्यम व इंग्रजी माध्यमाच्या मार्गदर्शन कार्यक्रमात कार्यक्रमाचे मुख्य अतिथी डॉ. शितल डान्टस यांनी काढले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून मालवण तालुक्यातील कट्टा येथील MKCL चे अधिकृत केंद्र… स्मिता कॉम्प्युटर एज्युकेशन कट्टा तर्फे व संगणक तज्ञ श्री.पालव यांनी AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आणि ML (मशीन लर्निंगचा) वापर कसा करावा, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी भविष्यच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी कलचाचणी, एमकेसीएलचे करिअर ॲप, दहावी परीक्षेची तयारी -मार्कांची भरारी, सायबर सिक्युरिटी अवेअरनेस यांची माहिती देऊन सादरीकरणाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.
आजचे युग हे वेगाने बदलत असून स्मिता कॉम्प्युटर ही संस्था ही संगणकीय सेवा देत असून निमसरकारी, सरकारी व भविष्यातील रोजगाराभिमुख शिक्षणासाठी असणारी गरज ओळखून अश्या प्रकारचे कार्यक्रम घेतले जात असून पाचवी ते दहावी बारावी पदवी मराठी माध्यम इंग्रजी माध्यम अश्या सर्व क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी एम एस सी आय टी ह्या प्राथमिक संगणकीय ज्ञाना पासून याची सुरुवात करून अश्या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करताना दहावी बारावी या विद्यार्थ्यांसाठी सुट्टीच्या दिवसात शिक्षण घेण्यासाठी स्मिता कॉम्प्युटर च्या संचालिका तसेच समन्वयक सौ.श्रद्धा नाईक यांनी प्रवृत्त केले.तसेच मनोरंजनातून शिक्षण या माध्यमातून स्मिता कॉम्प्युटर कट्टा यांनी प्रदर्शित केलेले ॲप याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी व्यासपीठावर प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ देवयानी गावडे पर्यवेक्षक श्री.महेश भाट ,डॉ. दादासाहेब वराडकर कॉलेजचे प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी प्रा. रविंद्र गावडे वराडकर इंग्लिश मीडियमचे मुख्याध्यापक ऋषी नाईक, ओंकार वराडकर तिन्ही विभागाचे सर्व शिक्षक शिक्षिका ,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वीणा शिरोडकर यांनी केले.तर कार्यक्रमाचे आभार स्मिता कॉम्प्युटर च्या प्रशिक्षिका सविता शिरोडकर यांनी मानले.