कोंकण एक्सप्रेस
विद्यामंदिर हायस्कूलचा मोहित सुतार जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम . .
कणकवली : प्रतिनिधी
आरोंदा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ अरोंदा संचलित आरोंदा. हायस्कूल आरोंदा आयोजित डॉ. पी .वाय .नाईक पुरस्कृत पत्नी स्वर्गीय सौ .पुष्पा प्रभाकर नाईक स्मृती प्रित्यर्थ शालेय विद्यार्थ्यांकरिता जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेमध्ये जिल्हा भरातील शाळांमधून 500 पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते सदर स्पर्धेमध्ये विद्यामंदिर हायस्कूल कणकवली चा विद्यार्थी मोहित नीळकंठ सुतार हा गट पाचवी ते सातवी मधून सहभागी झाला होता .या गटामध्ये 150 पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते या स्पर्धेमध्ये पाचवी ते सातवीच्या गटामधून कुमार मोहित याने काढलेल्या चित्राला जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. बक्षीस स्वरूपात रोख रुपये 5000 /- ,सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले .
मोहित सुतार याला प्रशालेचे कलाशिक्षक श्री प्रसाद राणे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल कुमार मोहित याचे संस्था चेअरमन सौ राजश्री साळुंखे ,अध्यक्ष श्री.भाई तवटे ,सचिव श्री विजयकुमार वळंजू, मुख्याध्यापक श्री. पी. जे. कांबळे ,पर्यवेक्षिका सौ. व्हि.बी.जाधव , ज्येष्ठ शिक्षक श्री.ए. व्हि.वनवे व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.