*कोंकण एक्सप्रेस*
*श्री देव काशिकलेश्वर मंदिर कलमठ द्वितीय वर्धापन दिन सोहळा ९ फेब्रुवारीला*
*कणकवली : प्रतिनिधी*
तालुक्यातील कलमठ गावचे ग्रामदैवत श्री देव काशिकलेश्वर मंदिराचा द्वितीय वर्धापनदिन सोहळा रविवार दि.९ फेब्रुवारी २०२५ रोजी संपन्न होत असून सर्व कलमठ वासीयांनी या सोहळ्यास सहपरिवार उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी आणि कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.यानिमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमपत्रिका पुढीलप्रमाणे – रविवार दि.९ फेब्रुवारी २०२५ सकाळी ९ .०० ते १.०० वा. धार्मिक विधी आणि संप्रोक्षण विधी,दुपारी १ .०० वा.महाप्रसाद ,सायं. ५.०० ते ८.०० वा.सुस्वर भजने,रात्री. ८.०० ते १२.00 वा.कलमठ गावातील महिला मंडळाचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
तरी भावीकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव काशिकलेश्वर उत्सव समिती,कलमठ यांनी केले आहे.