महिला सक्षमीकरणासाठी आर्थिक सक्षमीकरण शिबीर -सौ वैष्णवि मोंडकर,अध्यक्ष मातृत्ववरदान फाऊंडेशन

महिला सक्षमीकरणासाठी आर्थिक सक्षमीकरण शिबीर -सौ वैष्णवि मोंडकर,अध्यक्ष मातृत्ववरदान फाऊंडेशन

*कोंकण एक्सप्रेस*

*महिला सक्षमीकरणासाठी आर्थिक सक्षमीकरण शिबीर -सौ वैष्णवि मोंडकर,अध्यक्ष मातृत्ववरदान फाऊंडेशन*

*मालवण : प्रतिनिधी*

मालवण तालुक्यातील महिला बचत गट तसेच वैयक्तीक महिला वर्गाची व्यवसाय वाढीसाठी आर्थिक अडीअडचणी मुळे अनेक वेळा व्यावसायिक संधी पासून दूर रहावे लागते.कारण व्यवसाय करण्यासाठी तसेच असलेला व्यवसाय वाढीसाठी कर्ज सहज उपलब्ध होत नाही.यावर मार्ग म्हणून भाजपा मालवण तसेच मातृत्व वरदान फाऊंडेशन तर्फे नॅशनलाईज बँके मार्फत कर्ज आवश्यक असलेल्या महिला किंवा बचत गटा साठी हॉटेल श्री महाराज पेट्रोलपंप नजीक मालवण येथे गुरुवार दिनांक ४ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११.००  वाजता कर्ज शिबिराचे आयोजन करत आहोत>

गरजू व्यक्ती संस्था यांनी उपस्थित रहावे या शिबिराठी नॅशलाईज बँके चे अधिकारी उपस्थित राहणार असून तर्फे बँक च्या माध्यमातून प्रकल्प अहवाल बनविणे तसेच महिला किंवा बचत गटास कर्ज प्रस्ताव मजुरी साठी सहकार्य करणार तरी सदर शिबिरास उपस्थित राहणाऱ्या महिला किंवा संस्था प्रतिनिधी यांनी ९४२११ ५३०३५  या व्हाट्सअप नंबर वर मेसेज वर नाव नोंदणी करावी अशी विनंती सौ वैष्णवी मोंडकर भाजपा महिला मालवण शहर उपाध्यक्ष व अध्यक्ष मातृत्ववरदान फाऊंडेशन यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!