*कोंकण एक्सप्रेस*
*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेच्या पर्यवेक्षकपदी श्री अच्यूतराव वणवे यांची नियुक्ती*
*कणकवली : प्रतिनिधी*
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचे नूतन पर्यवेक्षकपदी श्री अच्युतराव वणवे सरांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आदरणीय श्री विजयकुमार वळंजू साहेब यांनी श्री वणवे सरांना पर्यवेक्षकपदासाठी शुभेच्छा दिल्या.श्री वणवे सर हे विद्यामंदिर प्रशालेचे अष्टपैलू व्यक्तीमत्व आहे.संस्थेचा आणि प्रशालेचा विकास होण्यासाठी तळमळीने कष्ट घेणारे श्री अच्यूतराव वणवे सर आहेत संस्था पदाधिकारी शासनाचे अधिकारी व पालक यांच्यातील दुवा साधून शाळेच्या विविध विकासाच्या योजना श्री वणवे सरांनी आणलेल्या आहेत शिक्षण विभागातील महत्वाची कामे तत्परतेने करून विद्यामंदिर प्राथमिक विभाग अनुदानित करण्यासाठी वणवे सरांनी खूप प्रयत्न करून शाळा अनुदाणित करून आणली.
आज आदर्श शाळा म्हणून प्राथमिक विभाग कार्यरत आहे विद्यामंदिर इंग्लिश स्कूलसाठी सरांनी कायम मान्यता व बोर्ड परीक्षा सांकेतांक मिळवून दिला आज इंग्लिश स्कूल कणकवली शहरात जोमाने सुरू आहे माध्यमिक विभागात सरांनी अनेक उपक्रम राबवून विद्यामंदिर आदर्श शाळा करण्याचा प्रयत्न केला आहे.या त्यांच्या कष्टाळू आणि ध्येयवादी प्रयत्नाला त्यांच्या कुटुंबियांची साथ लाभली त्यामुळेच सरांनी यशस्वी घोडदौड केली.
वणवे सरांची संस्थेच्या विकासाठी अनेक अंगाने धडपड सुरूच असते . क्रीडा विभाग सुसज्ज करण्यासाठी सरांची सतत तळमळ असते . संपूर्ण प्रशाळा आदर्श करण्याचा सरांचा मानस आहे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सरांनी वणवे सरांच्या पर्यवेक्षक कारकीर्तीसाठी सर्व स्टापच्या वतीने शुभेच्छा दिल्या विद्यामंदिर प्राथमिक विभाग विद्यामंदिर इंग्लिश स्कूलचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी वणवे सरांना प्रेमपूर्वक शुभेच्छा दिल्या . प्रास्ताविक श्री सिंगनाथ सरांनी केले आभार श्री संदिप कदम सरांनी मानले.