*कोंकण एक्सप्रेस*
*आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या मालवण बंदर जेटी येथे समुद्रतळ स्वच्छता मोहीम*
*मालवण :प्रतिनिधी*
वनशक्ती संस्था व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ,नीलक्रांती आणि युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्था यांच्या सहकार्याने मालवण बंदर जेटी येथे चौथ्या समुद्रतळ स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
सागरी कचरा,विशेषतः जैवविघटनशील नसलेला कचरा किनारपट्टीवरील परिसंस्था आणि समुदायांसाठी धोकादायक असून याचा सामना करण्यासाठी वनशक्ती संस्थेतर्फे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नीलक्रांती आणि युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्था यांच्या सहकार्याने प्रशिक्षित स्कुबा डायव्हर्ससह समुद्रतळ स्वच्छता मोहिमेचे रविवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. समुद्र तळ स्वच्छता मोहिमेस आमदार निलेश राणे यांची न उपस्थिती असणार आहे. सकाळी ७:३० ते १० यावेळेत प्रशि स्कुबा डायव्हर्ससह ही मोहीम होणार आहे.

