कणकवली विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ.वृषाली विठ्ठल जाधव मॅडम प्रदीर्घ सेवेतून निवृत्त

कणकवली विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ.वृषाली विठ्ठल जाधव मॅडम प्रदीर्घ सेवेतून निवृत्त

*कोंकण एक्सप्रेस*

*कणकवली विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ.वृषाली विठ्ठल जाधव मॅडम प्रदीर्घ सेवेतून निवृत्त*

*कणकवली : प्रतिनिधी*

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत प्रज्ञावंत अध्यापकाची प्रशालेच्या स्थापने पासूनच आदर्श परंपरा आहे.याच आदर्श मालिकेतील अध्यापिका सौ वृषाली जाधव मॅडम विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत तिस वर्षे मराठी व अर्थशास्त्र विषयांचे अध्यापन करून व्यक्तीगत ठसा उमटविला विद्यार्थी प्रिय अध्यापिका ‘ शिस्तबद्ध जीवन आणि निटनेटकेपणा स्वतः पासूनच आदर्श जीवनाची सूत्रे जोपासून प्रशालेत कर्तव्य बजावत राहिल्या.

मराठी विषयाचे ज्ञान स्वतः वाचन करून सर्व सामान्य विद्यार्थ्या पर्यंत पोहचविण्याचे कार्य मॅडमनी केले त्यामुळे विद्यार्थांना मराठी भाषेची अभिरूची निर्माण झाली.इयत्ता दहावी परिक्षेच्या मराठी विषयाच्या पेपर तपासणीस ते मार्गदर्शक अशा विविध भूमिका मॅडमनी प्रामाणिपणे पार पाडल्या तसेच प्रशालेत विविध उपक्रम मराठी भाषेचे व्याकरण या विषयी अनेक अध्यापनातील प्रयोग राबवून विद्यार्थांचा शैक्षणिक विकास साधला.

सौ जाधव मॅडम यांनी विद्यामंदिर प्रशालेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मदत करून त्यांच्या शिक्षणाच्या कामी उपयोगी पडत होत्या अनेक विद्यार्थी आपले भविष्य आजमावून जीवनात स्थिर झाले आहेत सेवापूर्ती कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त आदरणीय अनिलपंत डेगवेकर साहेब व संस्था पदाधिकारी उपस्थित होते प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पीजे कांबळे तसेच सर्व शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी माजी मुख्याध्यापक व माजी शिक्षक उपस्थित होते या सर्वांनीच सौ वृषाली जाधव मॅडम यांच्या सेवा कार्यातील कामाचा तसेच व्यक्तीमत्वातील गुणांचा आपल्या भाषणात आढावा घेतला व गुणगौरव करण्यात आला या कार्यक्रमासाठी त्यांचे पती विठ्ठल जाधव सर व त्यांची बहिण भाचा व दोन्ही मुले उपस्थित होती . प्रास्ताविक श्री सिंगनाथ सर यांनी केले आभार सौ साटम मॅडम यांनी मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!