*कोंकण एक्सप्रेस*
*केर येथे हत्तीचा धुमाकूळ सुरूच*
*शेतकऱ्याच्या बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान : शेतकरी भयभीत *
*दोडामार्ग : शुभम गवस*
दोडामार्ग तालुक्यातील केर गावात आज सकाळी पाच हत्तीच्या कळपाने धुमाकूळ घालून शेतकरी चंद्रकांत देसाई यांचा मालकीची बागायतीचे नुकसान केले.यात केळी,सुपारी आदीसह अन्य झाडांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.केर गावातच हत्तींनी ठाण मांडला आहे. त्यामुळे ऐन हंगामात काजू बागा बहरत असताना शेती बागायतीमध्ये फिरणे शेतकऱ्यांना अवघड झालेले आहे.जीव मुठीत घेऊन वावरावे लागत आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागातील बागायतदार हा उदरनिर्वाहसाठी काजू, आंबा, सुपारी नारळ, केळी आदींवरच अवलंबून असतो.मात्र तेच उत्पन्न हातातोंडाशी आले असताना हत्तींमुळे घास हिरावून घेतला जात आहे.तरी स्थानिक प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन हत्तीनं हुसकावून लावण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.