*कोंकण एक्सप्रेस*
*ओरोस येथे ११ फेब्रुवारीपासून अॅथलेटिक्स स्पर्धा*
*सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनतर्फे सब ज्युनिअर अॅथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन ११ फेब्रुवारी रोजी येथील क्रीडा संकुल येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत सर्व शाळा तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अॅथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष रणजितसिंग राणे यांनी केले आहे.
या स्पर्धा ८, १०, १२ आणि १४ या वयोगटातील मुलांसाठी आहेत. यातून प्रथम तीन क्रमांकाचे स्पर्धक पंढरपूर येथे राज्य स्पर्धेसाठी पाठविले जाणार आहेत. २३ व २४ फेब्रुवारीला राज्य स्पर्धा होणार आहेत.या स्पर्धेसाठी सहभागी होऊ इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांचे जन्म तारीख आणि खेळाचे प्रकार असे आहेत.
१४ वर्षांखालील मुले आणि मुली यांचा १ मार्च २०११ ते २८ फेब्रुवारी २०१३ चा जन्म असलेल्या विद्यार्थ्यांना ८० मी., ३०० मी धावणे, लांबउडी (५ मी.), गोळाफेक (दोन किलो), स्टैंडिंग थ्रो. १२ वर्षांखालील मुले व मुली यांचा जन्म १ मार्च २०१३ ते २८ फेब्रुवारी २०१५ चा जन्म असलेल्या विद्यार्थ्यांना ६० मी., ३०० मी धावणे, लांबउडी, (५ मी.), गोळाफेक, (२ किलो) स्टैंडिंग थ्रो. १० वर्षांखालील मुले आणि मुली यांचा जन्म १ मार्च २०१५ ते २८ फेब्रुवारी २०१७ रोजी असलेल्या विद्यार्थ्यांना ५० मी. व १०० मी. धावणे, गोळाफेक, १ किलो स्टैंडिंग थ्रो, लांबउडी (५ मी.). ८ वर्षांखालील मुले आणि मुली यांचा जन्म १ मार्च २०१७ ते २८ फेब्रुवारी २०१९ रोजी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ५० मी. व १०० मी धावणे, स्टैंडिंग ब्रॉड जंप, बॉल थ्रो अशा स्पर्धा घेण्यात येणार आहेत. जास्त खेळाडू सहभागी होणाऱ्या शाळेला विशेष ट्रॉफी, सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र, विजेत्या खेळाडूस मेरिट सर्टिफिकेट आणि मेडल दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी कल्पना तेंडुलकर (९३५९३९६४५०) यांच्याशी संपर्क साधावा.