*कोंकण एक्सप्रेस*
*झरेबांबर गावठाणवाडी येथील नाईक दशावतार नाट्यमंडळाचे मालक यांच्या निवासस्थानी उद्या माघी गणेश उत्सव जयंती*
*दोडामार्ग : शुभम गवस*
येथील पिकुळे लाडाचे टेंब येथे रत्नाकर निवास इथं उद्या शनिवार दिनांक १ फेब्रुवारी २०२५ रोजी माघी गणेश जयंती उत्सव साजरा होणार आहे.सकाळी ८.०० वाजता श्री गणेश मूर्तीस अभिषेक, १२ .०० वा. आरती आणि तीर्थप्रसाद, दुपारी १.०० वा.महाप्रसाद,दुपारी ३.०० वा. महिलांसाठी हळदी-कुंकू, सायंकाळी ६.०० वाजता झरेबांबर ग्रामस्थांचे सुश्राव्य भजन.या उत्सवात भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नाईक दशावतार नाट्यमंडळाचे मालक लक्ष्मण नाईक, सागर नाईक, यांनी केले आहे.