*कोंकण एक्सप्रेस*
*कोल्हापूर मधील टायर चोरीचे कनेक्शन रत्नागिरीशी*
*आरोपीला रत्नागिरी मधून उचलले : एक लाख 30 हजार रुपये किंमतीचे टायर चोरले*
*गोकुळ शिरगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल*
*कोल्हापूर : प्रतिनिधी*
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे हददीतील अशोक लेलँड ट्रकच्या टायर चोरीचा गुन्हा उघडकीस सुमारे १,३०,०००/- रुपये किंमतीचे टायर हस्तगत केले. गोकुळ शिरंगाव पोलीस ठाणेची कारवाई २१/२०२५ भा न्या सं कलम ३०६, ३(५)पोलिसांना दिलेल्या तक्रारी नुसार फिर्यादी राजासाब हुसेनसाब इंडी व व ४३ रा. नॅशनल हायवे नं १३ हमाल कॉलनी विजापुर राज्य कर्नाटक.गुन्हा घडला ता वेळ व ठिकाण दिनांक २५.१.२०२५ रोजी दुपारी १४:०० वा चे सुमारास विजयानंद पेट्रोल पंप कणेरीवाडी ता करवीर जि कोल्हापूर.प्राप्त माहिती व तांत्रिक माहितीच्या आधारे१,३०,०००/-१०००X रु त्यामध्ये २० साइजचे एमआरएफ व जेके कंपनीचे टायर प्रत्येक १३,०००/- रु किंमतीचे मिकिस दिनांक २५.१.२०२५ रोजी दुपारी १४:०० वा चे सुमारास विजयानंद पेट्रोल पंप कणेरीवाडी ता करवीर जि कोल्हापूर. ही कारवाई करणारे अधिकारी व अंमलदारमा पोलीस अधिक्षक सो, कोल्हापुर श्री महेंद्र पंडित मा. अपर पोलीस अधिक्षक, शहर विभाग, श्रीमती जयश्री देसाई , मा उपविभागीय पोलीस अधिकारी , करवीर विभाग, कोल्हापुर श्री सुजीतकुमार क्षीरसागर , मा सहा पोलीस निरीक्षक, श्रीमती मगदुम , पोलीस अधिकारी उपनिरीक्षक आप्पासो घाटगे, पोहेकॉ २०६६ संदेश कांबळे पोहेकॉ १७४८ नितेश कांबळे, पोहेकॉ २२९५ भरत कोरवी, पो कॉ १६२ संदेश पोवार, पो कॉ ११९५ किरण मोरे, चालक पो कॉ २३६४ आनंदा भोईटे
आरोपीचे नाव व पत्ता १) सिध्दाप्पा लक्ष्मण कटबर व व २३ रा. भुयार ता इंडी जि विजापूर राज्य कर्नाटक,२) रविंद्र कांतुकला व ३२ रा. रत्नागिरी जि रत्नागिरी आरोपी यांना अटक केली असुन सध्या पोलीस कस्टडी रिमांड मध्ये आहेत.
कोल्हापूर – गोकुळ शिरगांवदिनांक २५.१.२०२५ रोजी दुपारी १४:०० वा चे सुमारास विजयानंद पेट्रोल पंप कणेरीवाडी ता करवीर जि कोल्हापूर येथुन मनगोळी सप्लायर्स कंपनी बिजापुर ता. बिजापुर राज्य कर्नाटक या कंपनीमध्ये सहा महिन्यापासुन काम करीत असलेला नमुद आरोपी क्र १ याने त्याचे ताबेत अशोक leland गाडी नंबर KA.28 AA.8375 [सिमेंट बलकर] हा कंपनीकडुन माल पोचविणेस ताबेत घेतलेनंतर पंक्चर काढणारे इसमास फायनान्स कंपनीचे कर्ज असुन फायनान्स कंपनी गाडी घेवुन जाणार आहे.त्याकरीता मालकाने टायर बदलण्यास सांगितले आहे असे सांगुन नमुद वाहना चे एकुण १० नवीन टायर काढुन त्या ठिकाणी जुनी चाके बसवुन गाडी सोडुन फिर्यादीचे संमतीशिवाय नमुद वर्णनाच्या व किमतीच्या टायरी चोरुन घेवुन गेला आहे याबाबत फिर्याद प्राप्त झालेने वरील प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाची फिर्याद प्राप्त झाले नंतर प्राप्त माहीतीचे अनुशंगाने व तांत्रीक माहीताचा वापर करुन गोकुळ शिरगाव पोलीस ठाणेकडील तपास पथक तयार करुन अरोपी नं.१ व अरोपी नं.२ यांना जिल्हा रत्नागिरी येथुन दिनांक २९/०१/२०२४ रोजी चौकशी कामी ताबेत घेतले. व त्यांना विश्वासात घेवुन चौकशी करीता सदर गुन्हा दोघांनी मिळून केलेची कबुली दिली आहे.
पण आरोपीत हे चोरीस गेले मुददेमालाची माहीती न देता तपासकामी सहकार्य करीत नसलेने व तपास कामी अरोपी यांना अटक करणेची वाजवी कारणे असलेने आरोपीत नं. १ व २ यानां दिनांक २९/०१/२०२४ रोजी १८.५३ वा. अटक करणेत आलेली असुन त्यांचेकडुन सुमारे १,३०,०००/- रुपये किंमतीचे टायर हस्तगत केले आहेत.