*कोकण एक्सप्रेस*
*दोडामार्ग तहसिलदार यांनी पत्र देत अखेर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आंदोलन पाचव्या दिवशी मागे..*
*दोडामार्ग : शुभम गवस*
दोडामार्ग तालुक्यातील गौण खनिज उत्खनन, त्याची वाहतूक तसेच सुरु असलेल्या दगडी खाणी, क्रशर हे अवैध असल्याचा ठपका ठेवत त्यावर कारवाई करावी यासाठी शिवसेना उबाठा तालुका प्रमुख संजय गवस, लक्ष्मण उर्फ बाळा नाईक , विनिता घाडी, संदेश वरक, जेनीफर लोबो, अर्जुन मोरजकर आदी पदाधिकाऱ्यांनी २६ जानेवारी पासून उपोषण पुकारले होते. हे उपोषण पाचव्या दिवशी मागे घेण्यात आले, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी इतर शिवसेना पदाधिकारी, तिराळी विभागाचे अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी तहसिलदार दोडामार्ग यांनी पत्र देत दोडामार्ग तालुक्यातील गौण खनिज खाणींची योग्य मोजमापे करून कारवाई करणेत येईल, शिरंगे येथील दगडी खाणीची भूमि अभिलेख कडून मोजणी करण्यात येईल, तर तिराळी धरण क्षेत्राला लागून असलेल्या क्रशर बाबत चौकशी व कारवाई करण्यात येईल असे म्हटले आहे. या पत्रानंन्तर सदर पदाधिकारी यांनी आपले उपोषण मागे घेतले.