*कोंकण एक्सप्रेस*
*देशभक्तीपर समूह गीत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद*
*दोडामार्ग : शुभम गवस*
लक्ष्मीबाई सीताराम हळबे कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात एन.सी.सी.विभागा मार्फत विद्यार्थी विकास घडविण्यासाठी अनेक उपक्रम आयोजित केले जातात. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्र प्रेम,देशभक्तीची जाणीव जागृती करण्यासाठी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात देशभक्ती विषयावरील समूहगीत स्पर्धा आयोजित करण्यात आली.या स्पर्धेत महाविद्यालयातील विविध शाखेतील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.या वेळी विजेत्या संघाचे मान्यवरांच्या हस्ते सम्मान करण्यात आला.
आजच्या धावत्या आणि स्पर्धेच्या युगात विद्यार्थी हा शिक्षण,करिअर आणि मनोरंजन यात गुरफटला आहे.त्यात देश प्रेम आणि देश कर्तव्य याची जाणीव सतत असणे ही आवश्यक आहे.आजचा विद्यार्थी उद्याचा सुजान नागरिक आहे.म्हणूनच विद्यार्थी दशेतच त्याच्या अंगी कौशल्य शिक्षण, नागरी कर्तव्य, नैतिक मूल्य, राष्ट्र प्रेम याचे गुण आत्मसात होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांन मध्ये एकता, अनुशासन, समाज सेवा, राष्ट्र प्रेम, बद्दल जाणीव निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे.यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष सावंत यांच्या संकल्पनेतून वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. या मध्ये देशभक्ती विषयावरील समूह गीत स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी एकूण बारा समूहानी या स्पर्धेत भाग घेतला. समूह गीता सोबतच वाद्यांची साथ विद्यार्थ्यांनी दिली आणि या स्पर्धेला रंगत आली. देशभक्तीच्या विविध गीतातून राष्ट्रभक्तीचे हर्ष उल्हासित वातावरण तयार झाले होते.
या स्पर्धेची सुरुवातीस आयोजक डॉ.पी.एन.ढेपे यांनी प्रास्ताविक सादर कले. यानंतर स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. स्पर्धे नंतर डॉ.एस.एन.खडपकर यांनी देशभक्ती विषयावर आपले विचार व्यक्त केले. स्पर्धेचे परीक्षक प्रा.दर्शनी कोटकर, प्रा.भाग्यश्री गवस प्रा.सेफली गवस यांनी वेजेत्या गटांची नावे जाहीर केली. या मध्ये प्रथम, द्वितीय, आणि तृतीय क्रमांक मिळवलेल्या गटांचा सम्मान करण्यात आला. या नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्र.प्राचार्य डॉ. सोपान जाधव यांनी आपले अध्यक्षीय भाषण सादर केले. त्यांनी विद्यार्थ्यांना भारतीय स्वतंत्रता लढा आणि हुतात्म्यांचे बलिदाना चा इतिहास विद्यार्थ्यांना सांगितला आणि विजेत्या समूह गटास शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन पुष्पलता गावडे यांनी केले तर आभार प्रदर्शन स्वानंदी गवस यांनी केले.