*कोंकण एक्सप्रेस*
*मालवणमध्ये सेवांगण येथे ९ फेब्रुवारीला मोफत आरोग्य तपासणी शिबीर*
*मालवण : प्रतिनिधी*
अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान गोवा आणि बॅ. नाथ पै सेवांगण मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबीराचे आयोजन दि. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९. ३० ते दुपारी २.०० या वेळेत एस.एम.जोशी संकुल सेवांगण,मालवण येथे आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरा मध्ये हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब ऍलर्जी, अस्थमा, त्वचाविकार, पचनाच्या समस्या, हाडांचे व सांध्याचे आजार, किडनी विकार, पक्षाघात, वातविकार, मलावरोध, मूळव्याध, भगंदर, बालरोग, स्त्रीरोग, अन्य जुनाट विकार, थायरॉईड आदी आजारांवर मोफत तपासणी व मोफत औषध देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संजय आचरेकर ८४४ ६२६ ९७०४ , लक्ष्मीकांत खोबरेकर ९४२२ ९४६ २१२ शैलेश खांडाळेकर ९४२३ ८८४ ८५२ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन बॅ. नाथ पै सेवांगण तर्फे करण्यात आले आहे.