*कोंकण एक्सप्रेस*
*कलमठ येथे महिला दिनानिमित्त जिल्हास्तरीय महिला मॅरेथॉन स्पर्धेच आयोजन*
*कणकवली : प्रतिनिधी*
जागतिक महिला दिनानिमित्त श्री फोंडकन देवी स्पोर्टस् अकॅडमी निरोम व सिंधुदुर्ग जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या विद्यमाने ८ मार्च रोजी कणकवली कलमठ बिडयेवाडी येथील अंगणवाडी शाळेच्या शेजारी सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय महिला मॅरेथॉन स्पर्धा व गुणवंत महिला क्रीडा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
ही मॅरेथॉन स्पर्धा १८ वर्षाखालील मुली, खुला गट व ४५ वर्षावरील महिला या तिन्ह गटात घेण्यात येणार आहे.विजयी स्पर्धकांना चषक व प्रविण्या प्रमाणपत्र तसेच उत्कृष्ट संघाला पारितोषिक व सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. स्पर्धकांनी अर्ज २५ फेब्रुवारीपर्यंत कणकवली एसटी स्टॅन्ड येथील रुपेश वाळके बुक स्टॉल येथे जमा करावेत. अधिक माहितीसाठी समीर राऊत ७९००१९७४७५ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष समीर राऊत व सचिव सुवर्ण जोशी यांनी केली आहे.