*कोंकण एक्सप्रेस*
*सावंतवाडी येथे १ फेब्रुवारीला शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
अंश एज्युकेशन इन्स्टिट्यूट,सावंतवाडी यांच्यावतीने शिष्यवृत्ती सराव परीक्षांचे आयोजन १ फेब्रुवारी रोजी कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी येथे करण्यात आले आहे.ही परीक्षा दुपारी २ ते ५ या वेळेत होईल. इयत्ता पाचवी व आठवीच्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी सदर परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांनी या परीक्षेत जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे आवाहन इन्स्टिट्यूटचे संचालिका अश्विनी जाधव यांनी केले आहे. अधिक माहिती व नोंदणीसाठी 9923019377, 8412853987, 8551075919 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन अंश एज्युकेशन इन्स्टिट्यूट मार्फत करण्यात आले आहे.