*कोंकण एक्सप्रेस*
*सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची सभा ३ फेब्रुवारीला*
*सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी*
मा.ना.श्री.नितेश राणे,मंत्री,मत्स्यव्यवसाय व बंदरे तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या अध्यक्षतेखालो सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची सभा सोमवार दि. ०३.०२.२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता, जिल्हा नियोजन समिती सभागृह (नवीन), जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करणेत आलेली आहे.
सभेची विषय पत्रिका खालीलप्रमाणे आहे,
१. दिनांक १६.०७.२०२४ रोजी संपन्न झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या इतिवृत्तास मान्यता देणे,
२. दिनांक १६.०७.२०२४ रोजी संपन्न झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या इतिवृत्त कार्यपूर्ती अहवालास मान्यता देणे.
३. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२४-२५ माहे जानेवारी २०२५ अखेर खर्चास मान्यता देणे.
४. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२५-२६ अंतर्गत प्रारुप आराखड्यास मान्यता देणे,
५. अनुसुचित जाती उपयोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील योजना सन २०२४-२५ माहे जानेवारी २०२५ अखेर खर्चास मान्यता देणे.
६. अनुसुचित जाती उपयोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील योजना सन २०२५-२६ अंतर्गत प्रारुप आराखड्यास मान्यता देणे.
७. मा. अध्यक्ष यांच्या परवानगीने आयत्या वेळचे विषय.