*कोंकण एक्सप्रेस*
*हत्ती पकड मोहिमेबद्दल वनविभाग उदासीन : ९ फेब्रुवारीची दिली डेडलाईंन*
*अन्यथा साखळी उपोषण : प्रविण गवस यांचा पंचक्रोशीतील सरपंचांसह पुन्हा इशारा*
*दोडामार्ग : प्रतिनिधी*
कर्नाटक राज्यातील खानापूर येथे हत्ती पकड मोहीम यशस्वी झाली होती,त्याचं धर्तीवर दोडामार्ग तालुक्यातील तिराळी पंचक्रोशीतील रानटी हत्तीना पकडा व आमची या त्रासातून मुक्तत करा अथवा १० फेब्रुवारी पासून वनविभागाच्या कार्यालयासमोर साखळी उपोषण छेडण्याचा इशारा सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष प्रविण गवस यांच्या नेतृत्वाखाली पांचक्रोशीतील सरपंच व उपसरपंच यांनी दिला आहे.
हेवाळे, केर, मोर्ले, तेरवण- मेढे, घोटगेवाडी, पाळये, सोनावल, कोनाळ, परमे, घोटगे आदी गांवात मोठ्या प्रमाणात हत्ती प्रश्न आहे, येथील शेतकऱ्यांना मागील अनेक वर्षे हत्ती संकटाने ग्रासले आहे, हाता तोंडाशी आलेला हंगामी पिकाचा घास ह्या हत्तीच्या तोंडाशी जातो आणि इथला शेतकरी उपाशी मरतो याकडे वनविभागाचे कायमच दुर्लक्ष होतं आहे, यासाठी जशी हत्ती पकड मोहीम कर्नाटक राज्यातील खानापूर तालुक्यात राबवली तशीच मोहीम दोडामार्ग तालुक्यातील या हत्ती प्रवण क्षेत्रात राबवावी अशी मागणी सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष प्रविण गवस यांच्या नेतृत्वाखाली या पंचक्रोशीतील सरपंचांनी वनविभागाकडे केली. ९ फेब्रुवारी पर्यंत याबाबत योग्य कार्यवाही न झाल्यास या भागातील सरपंच, उपसरपंच, सदस्य व गावातील ग्रामस्थ यांचे १० फेब्रुवारी पासून साखळी उपोषण करू असा इशारा सदरच्या निवेदनात दिला.
या अगोदर निवेदन देऊनही वनविभागाचे दुर्लक्ष : हत्तीची सख्या वाढली
दोडामार्ग तालुक्यातील तिराळी पंचक्रोशीतील सरपंच यांनी हत्ती पकड मोहीम राबवा यासाठी निवेदन दिले होते मात्र याकडे वनविभागाने दुर्लक्ष केले मात्र आता सरपंच संघटनेने आक्रमक होतं कोणत्याही परिस्थितीत हत्ती पकड मोहीम राबवाच हा पवित्रा घेतला आहे.