बांद्यात पर्यटकांच्या कारला अपघात

बांद्यात पर्यटकांच्या कारला अपघात

*कोकण Express*

*बांद्यात पर्यटकांच्या कारला अपघात*

*वीज पोलला कार आदळल्याने अनेकांच्या घरातील इलेक्ट्रॉनिक साधने जळाली*

*बांदा ः प्रतिनिधी*

इंदौर मध्यप्रदेशहून बांदा – दाणोलीमार्गे गोव्याच्या दिशेने जाणार्‍या पर्यटकांच्या कारचा बांदा गवळीटेंब येथे अपघात झाला. चालकाला डुलकी आल्याने कारवरील ताबा सुटून कार वीजेच्या खांबावर आदळली. त्यामुळे अचानक वीजपुरवठा वाढून परिसरातील नागरिकांची इलेक्ट्रॉनिक साधने जळून खाक झाली आहेत. गवळीटेंब परिसरातील वीजपुरवठा खंडीत झाला असून ग्राहकांची टीव्ही, फॅन, फ्रिजसहीत लाखो रुपयांची इलेक्ट्रॉनिक साधने जळाली आहेत. हा अपघात आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास हॉटेल सुभेदार नजीक झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. घटनास्थळी महावितरणचे सहाय्यक अभियंता सुभाष आपटेकर, वायरमन बापू देसाई, डावकुरे दाखल झाले असून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरु आहे. अपघाताची नोंद बांदा पोलीसात अद्यापपर्यंत झाली नसल्याचे पोलीसांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!