गुरुवर्य कृष्णाजी वराडकर यांना मरणोत्तर बांदा ग्रामरत्न पुरस्कार

गुरुवर्य कृष्णाजी वराडकर यांना मरणोत्तर बांदा ग्रामरत्न पुरस्कार

*कोंकण एक्सप्रेस*

*गुरुवर्य कृष्णाजी वराडकर यांना मरणोत्तर बांदा ग्रामरत्न पुरस्कार*

*बांदा : प्रतिनिधी*

बांदा येथील खेमराज प्रशालेचे माजी मुख्याध्यापक तथा विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या घडवणारे आदर्श शिस्तप्रिय शिक्षक कै.कृष्णाजी वराडकर यांना बांदा ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात येणारा बांदा ग्रामरत्न पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आला.76 व्या प्रजासत्ताक दिनी बांदा गांधी चौक येथे गावाच्या एकत्रित झेंडावंदन सोहळ्यात बांदा सरपंच प्रियांका नाईक आणि उपसरपंच आबा धारगळकर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.कै.वराडकर सर यांच्या वतीने त्यांचे सुपुत्र सुहास वराडकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.यावेळी या पुरस्काराची संकल्पना मांडणारे ग्रामस्थ नागेश सावंत व्यासपीठावर उपस्थित होते.

गत वर्ष 2024 पासून बांदा ग्रामपंचायतीतर्फे हा बांदा ग्रामरत्न पुरस्कार देण्यास आरंभ झाला आहे.गतवर्षी जागतिक आरोग्य संघटनेचे माजी सल्लागार डॉ.बी.बी.गायतोंडे यांना पुरस्कार मारणोत्तर प्रदान करण्यात आला होता.यावर्षी गुरुवर्य वराडकर वयाची शंभरी पूर्ण करत होते.त्यांचे नाव पुरस्कार साठी आधीच निश्चित करण्यात आले होते.परंतु दुर्दैवाने नुकतेच त्यांचे निधन झाल्यामुळे त्यांना हा पुरस्कार मरणोत्तर देण्यात आला.

शाल,श्रीफळ,स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.यावेळी ग्रामपंचायत सदस्य रूपाली शिरसाट यांनी या सन्मान पत्राचे वाचन केले. समस्त ग्रामस्थांनी यावेळी टाळ्या वाजवून वराडकर सरांच्या कार्याला मानवंदना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!