*कोंकण एक्सप्रेस*
*श्रमिक कामगार संघटने मार्फत फेब्रुवारीत होणार बांधकाम कामगारांच्या विद्यार्थी सन्मान सोहळा*
*कुडाळ : प्रतिनिधी*
श्रमिक कामगार संघटनेची सभा कुडाळ येथे आयोजित करण्यात आली होती.यावेळी या सभेला श्रमिक कामगार कल्याणकारी संघ संस्थापक अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. बांधकाम कामगार यांच्या विविध मुद्यांवर यावेळी चर्चा केली. आपली संघटना ही बांधकाम कामगार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून ज्या ठिकाणी कामगार यांच्या वर अन्याय होईल तेथे संघटना म्हणून आम्ही कामगार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू यासाठी कामगार यांनी संघटीत होणे गरजेचे आहे असे मत यावेळी व्यक्त केले. तसेच या सभेमध्ये श्रमिक कामगार संघटना यांच्या मार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम कामगार यांच्या मुलांना शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याकरिता संघटनेमार्फत गरजू ,गुणवंत अश्या विद्यार्थ्याचा गुणगौरव सन्मान सोहळा आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे. हा विद्यार्थी सन्मान सोहळा फेब्रुवारी महिन्यात आयोजित करण्याचे सभेत ठरविण्यात आले.
तसेच सदर गुणवंत विद्यार्थांना प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचे ठरविले. तरी ज्या दानशूर व्यक्तींना स्वमताने शैक्षणिक साहित्य द्यायचे असेल तर संघटने मार्फत देऊ शकता असे ही ठरविण्यात आले.तसेच यावेळी संघटना वाढ विस्तार करण्यासाठी यावेळी नवीन पदाधिकारी यांची नेमणूक करण्यात आली. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष पदी म्हापण येथिल संदिप चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी सभेला श्रमिक कामगार कल्याणकारी संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्राजक्त चव्हाण, जिल्हा अध्यक्ष रामदास तेंडोलकर, महिला जिल्हा अध्यक्ष सौ. पूजा बागकर, जिल्हा उपाध्यक्ष श्री.संदीप चव्हाण, बांबर्डे अध्यक्ष सौ. संजना पाटकर, वेंगुर्ला अध्यक्ष श्री. विजय बागकर, मार्गदर्शक श्री. किरण कुबल, दोडामार्ग अध्यक्ष श्री. भैरू पाटील, कुडाळ अध्यक्ष श्री. नारायण येरम, सावंतवाडी अध्यक्ष आत्माराम साटेलकर, सावंतवाडी संघटक श्री. राजेश चव्हाण, दिगंबर गोवेकर, शिवाजी गोवेकर, जयवंत मोरजकर, संजय पाळ्येकर, संदीप पाल्येकर, रामचंद्र गोवेकर, महादेव नाईक, सौ. स्वप्नाली पाल्येकर, सौ रुचिता पाल्येकर, स्मिता गोवेकर, सौ.जयवंती गोवेकर, चैताली गोवेकर, सौ. मंगल गोवेकर, सौ. ममता आसोलकर, श्री. संतोष बांदेकर उपस्थित होते.